Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Four People Killed in Malegaon Manmad Road Accident

मालेगाव-मनमाड मार्गावरील चोंढी घाटात ट्रक व कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 26, 2019, 10:18 AM IST

  • Four People Killed in Malegaon Manmad Road Accident

    मालेगाव - अाेव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात इर्टिगा कार समाेरून येणाऱ्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात ४ जण ठार, तर ४ गंभीर जखमी झाले अाहेत. २ सख्ख्या बहिणींसह त्यांच्या २ बालकांचा मृतांत समावेश अाहे. हा भीषण अपघात साेमवारी (दि. २५) सकाळी ६ वाजता मनमाड-मालेगाव राेडवरील चाेंढी घाटात घडला.


    पुणे येथील विजितसिंग परमार व नांदेडला राहणारे मृत्युंजय सिंग हे दाेघे साडू प्रयागराज (अलाहाबाद) येथे कुटुंबीयांसह विवाहासाठी गेले हाेते. विवाह साेहळा अाटाेपून ते इर्टिगा कारने पुण्याकडे परतत हाेते. मनमाड-मालेगाव राेडवरील चाेंढी घाटाच्या पहिल्या वळणावर अाेव्हरटेक करताना कारने समाेरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. धडकेमुळे कारचा चक्काचूर झाला. कारमधील अंजूसिंग विजितसिंग परमार (२८), शालिनीसिंग मृत्युंजयसिंग (३०) या दाेघी सख्ख्या बहिणी व त्यांची मुले रिद्धिसिंग मृत्युंजयसिंग (६), वीरेंद्र विजितसिंग (७) हे जागीच ठार झाले. विजितसिंग परमार (३५), मृत्युंजयसिंग नरेंद्र बहादूरसिंग (३६), रितासिंग मृत्युंजयसिंग (५) व वंश विजितसिंग (दीड वर्ष) हे चार जण गंभीर जखमी झाले अाहे. अपघाताची माहिती मिळताच तालुका पाेलिस ठाण्याचे निरीक्षक केशव पाटील व महामार्ग पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी मालेगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प हाेती.

    पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो..

  • Four People Killed in Malegaon Manmad Road Accident
  • Four People Killed in Malegaon Manmad Road Accident

Trending