आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मुंबईतील डोंगरी परिसरात असलेली चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली जवळपास 30 ते 40 जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. डोंगरीतील तांडेल स्ट्रीटवरील अब्दुल हमीद दर्ग्याजवळची केसरबाई ही ग्राऊंड फ्लोअर अधिक 4 मजली इमारत कोसळली. दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही इमारत कोसळण्याची घटना घडली आहे.
इमारात कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ढिगारा काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पण नेमके किती लोक ढिगाऱ्याखाली अडकले याची अधिकृत माहितीच नाही. दुपारी बाराच्या सुमारास एनडीआरएफच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेतली.
Mumbai: Kesarbai building has collapsed at Tandel street, in Dongri. More than 40 people are feared trapped. pic.twitter.com/H2eVbtgaH6
— ANI (@ANI) July 16, 2019
ही इमारत म्हाडाची होती. या इमारतीत जवळपास 15 कुटुंब राहात होते, अशी माहिती मिळत आहे. सुदैवाने आज मुंबईत पाऊस पडत नसल्यामुळे बचावकार्य वेगाने सुरू आहे. बचाव कार्यादरम्यान अनेकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे
इमारत धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते
जी इमारत कोसळली ती अत्यंत जुनी होती. इमारत धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. तसेच तिच्या पुनर्विकासाचे काम विकासकाला देण्यात आले होते. आता नेमके काय घडले, दुर्घटना कशी झाली, यासाठी कोण जबाबदार आहे, याची सविस्तर माहिती घेऊन मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधेल, अशी प्रतिक्रीया म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.
80-100 वर्षे जुनी आहे इमारत- स्थानीक
स्थानीक नागरिकांनी सांगितल्यानुसार, इमारत 80-100 वर्षे जुनी आहे. इमारत खूप खराब अवस्थेत आली होती. परिसरात जोरदार पाऊस पडला आणित त्यानंतर वेगाने हवा सुरू झाली. त्यानंतर एक मोठा आवाज आला आणि बाहेर आल्यावर इमारत पडलेली दिसली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.