आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब सीमेवर टॅक्सी पळवून 4 संशयित पसार, अलर्ट जारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पठाणकोट/ सुजानपूर - साधारण तीन वर्षांपूर्वी पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ल्यासारखीच घटना येथे घडली. मंगळवारी रात्री चार संशयित बंदुकीचा धाक दाखवून टॅक्सीतून पळाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अति दक्षतेचा इशारा जारी करून सीमा परिसरात शोध मोहीम हाती घेतली आहे. सीमेवरील जिल्ह्यांशिवाय जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेशाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली. आरोपींनी जम्मू रेल्वेस्थानकावरून मेजर सरबजित सिंग यांच्या नावाने इनोव्हा बुक केली होती. त्यांनी त्यासाठी ओळखपत्राचा कोणताही पुरावा दिला नाही. जम्मू रेल्वेस्थानकावर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक युवक लष्कराच्या मंकी कॅपमध्ये दिसत आहे.  


टॅक्सी चालक राजकुमार यांनी पोलिसांना सांगितले की, मंगळवारी रात्री ९.०० वाजता जम्मू स्थानकाच्या टॅक्सी स्टँडवर चार जणांनी पठाणकोटसाठी गाडी बुक केली होती. पंजाबमध्ये माधोपूरजवळ कर भरणा करण्यासाठी गाडी थांबली होती. या दरम्यान एका युवकाने उलटी येत असल्याचे सांगत गाडी थांबवण्यास सांगितले. गाडी बाजूला लावताच चालकाच्या आसनाच्या मागे बसलेल्या युवकाने बाजूने त्याचा गळा दाबला. एकाने मागून बंदुकीसारखी वस्तू दाखवून धमकावले. मोबाइलही हिसकावला. त्याला खाली उतरवून चौघे गाडी घेऊन पळून गेले. वरिष्ठ पोलिस अधिकारी विवेकशील सोनी म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नाक्यांवर तपासणी केली जात आहे. 


तीन वर्षांपूर्वीही अतिरेक्यांनी इनोव्हाचे पळवली : ३१ डिसेंबर २०१५ च्या रात्री पाकिस्तानातून आलेल्या ४ अतिरेक्यांनी बमियालजवळ इनोव्हा पळवून चालक एकागर सिंगची हत्या केली.यानंतर पोलिस अधीक्षक सलविंद्र सिंग यांची कार पळवली व २ जानेवारीच्या पहाटे पठाणकोट हवाई तळावर हल्ला केला होता.

बातम्या आणखी आहेत...