आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडमध्ये घरातून चार तलवारी जप्त; लुटीचा तपास करत असताना केली कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड -  अवैधरित्या तलवारी बाळगल्याप्रकरणी सिल्लोड पोलिसांनी केलेल्या कारवाईत शनिवारी  (दि. १८) रात्री संशयित दोन आरोपींसह चार धारदार तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार यांनी शनिवारी तक्रार दाखल केली. 


सुनील पवार यांनी फिर्यादीत म्हटले की, शहरात झालेला लुटीचा तपास करत  असताना राहूल मिलिंद सूर्यवंशी जयभवानीनगर, सिल्लोड याच्याकडे दोन तलवारी ठेवल्याची माहिती मिळाली. पथकासोबत पवार यांनी राहूल सूर्यवंशी याच्या घराची झडती घेतल्यानंतर भिंतीच्या कोपऱ्यात लपवून ठेवलेल्या दोन तलवारी मिळून आल्या. त्यानंतर संबंधितास  अधिक विचारपूस केली असता त्याने एक तलवार त्याचा मित्र सोमिनाथ साहेबराव पवार, रा. जयभवानीनगर, सिल्लोड यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्याच्या घरी पोलिस गेले असता संबंधित पुणे येथे गेला असल्याचे समजले. त्याच्या पत्नीस विचारपूस केली असता तलवार घराच्या छतावर  ठेवल्याचे सांगितले. त्याठिकाणाहून तलवार हस्तगत केली. नंतर जितेंद्र डिडोरे, रा. म्हसोबा गल्ली, सिल्लोड याच्याकडे एक तलवार असल्याचे राहूल सूर्यवंशी याने सांगितले. त्याठिकाणी पोलिस गेल्यानंतर त्यांना येथेही एक तलवार आढळून आली. पोलिसांनी राहूल सूर्यवंशी (२२), जितेंद्र डिडोरे (२४) या दोघा संशयितांना तलवारीसह ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...