आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K Encounter: पुलवामा जिल्ह्यात सर्च ऑपरेशनदरम्यान चकमक, 4 दहशतवाद्यांना कंठस्नान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक उडाली. पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा परिसरात काही दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती पोलिस आणि सैनिकांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री उशीरा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. शोध सुरू असताना अचानक सैनिकांवर गोळीबार झाला आणि धुमश्चक्री उडाली. ही चकमक अजुनही सुरू आहे.

 

4 दहशतवाद्यंना कंठस्नान, दारुगोळा जप्त

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील एका घरात जैश ए-मोहम्मदचे दहशतवादी लपले होते. जवानांनी त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. परंतु, त्यांनी उलट जवानांवरच फायरिंग सुरू केली. यानंतर झालेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यापैकी रात्री 2 आणि सकाळी दोन असे 4 दहशतवादी मारले गेले. या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. 

 

#JammuAndKashmir: Exchange of fire underway between security forces & terrorists in Rajpora, Pulwama. Search operation was launched after inputs that terrorists were hiding in the area. More details awaited. pic.twitter.com/JFpjAXJhWH

— ANI (@ANI) December 29, 2018

 

 

बातम्या आणखी आहेत...