आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार अतिरेक्यांचा खात्मा, दोन अतिरेक्यांना अटक; शोधमोहिमेदरम्यान केली कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- जम्मू-काश्मिरातील बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांनी बुधवारी चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा केला. जवानांनी लादूराच्या जंगलांत शोधमोहिमेदरम्यान ही कारवाई केली. अतिरेक्यांच्या गोळीबारात एक जवान जखमी झाला. दुसरीकडे, पुलवामा आणि बारामुल्लातून पोलिसांनी एका अतिरेक्यासह आणखी एकाला अटक केली आहे. 


पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी मंगळवारी अतिरेकी अब्दुल माजीद शहाला पुलावामाच्या अवंतीपुरातून अटक केली. अब्दुल्ला हा बारामुल्लाचा रहिवासी आहे. तो दिल्लीचा नोंदणी क्रमांक असलेल्या कारमधून प्रवास करत होता. त्याच्याकडून शस्त्रास्त्रे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. 


बारामुल्ला भागातच अतिरेक्यांच्या हस्तकालाही अटक करण्यात आली आहे. इरफान अहमद गनी हा अल कैदाशी संबंधित गजवत-उल-हिंद संघटनेसाठी काम करत होता. त्याच्याकडून हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...