आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्याच्या चिंचगावजवळ चारचाकी डस्टर आणि उसाच्या ट्रकची धडक, गाडीने पेट घेतल्याने 2 जणांचा जळून मृत्यू

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

सोलापुर : कुर्डूवाडी बार्शी मार्गावर माढा तालुक्यातील चिंचगाव गाव व हाॅटेल वैशाली नजीक रविवारी रात्री अकराच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. डस्टर चारचाकीची उसाच्या ट्रॅक्टरला मागुन जोराची धडक बसली आणि क्षणार्धातच डस्टरने पेट घेतला. त्यामुळे गाडीतील दोघे जळुन खाक झाले. हृदय पिळवटुन टाकणाऱ्या या अपघाताने सर्वांची मन सुन्न झाली आहेत. काकासाहेब सुरेश राऊत(वय २८), अविनाश मल्लाप्पा गिराम(वय ३३) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघे ही रायगव्हाण चे रहिवासी असुन काकासाहेब राऊत हे छावा संघटनेचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष आहेत.


या गाडीतून चौघे जण पुण्याला मुलासाठी स्थळ पाहण्यासाठी निघाले होते. दरम्यान मुलगी पाहिल्यानंतर दोघे नातेवाईकाजवळ थांबले आणि आपल्या गावाकडे रविवारी रात्री पुण्याहुन निघाले होते. दरम्यान त्यांच्यावर रविवारी रात्री काळाने झडप घातली आणि हा अपघात झाला. कुर्डूवाडी पोलिसांनी पेटलेली गाडी विझवण्यासाठी कुर्डूवाडी नगरपालिकेचे अग्निशमन दलही तैनात केले. घटनास्थळी कुर्डूवाडी रुग्णवाहिका पोहचताच संतोष चव्हाण आणि बालाजी कोळेकर या १०८ रुग्णवाहिकेच्या दोघा कर्मचार्यानी गाडीतुन मृत व्यक्तिना बाहेर काढून कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात आणले. काही उपस्थिंतानीही मदत केली. घटनेची माहिती मिळताच मृत व्यक्तीच्या नातेवाईक कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात पोहोचले.