Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Four year old child dead due to dengue

साडेचार वर्षाच्या बालिकेचा डेंग्यूने मृत्यू; ६८पैकी १७ नमुने 'पाॅझिटिव्ह'

प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 09:54 AM IST

गेल्या पंधरा दिवसांत पाय पसरवणाऱ्या डेंग्यूने शहरात पहिला बळी घेतला अाहे. शिवाजीनगरातील संभाजी चाैकातील रहिवासी साडेचार

 • Four year old child dead due to dengue

  जळगाव- गेल्या पंधरा दिवसांत पाय पसरवणाऱ्या डेंग्यूने शहरात पहिला बळी घेतला अाहे. शिवाजीनगरातील संभाजी चाैकातील रहिवासी साडेचार वर्षीय बालिकेचा डेंग्यू पाॅझिटीव्ह अाजाराने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खडबडून जागे झालेली अाराेग्य यंत्रणा शिवाजीनगरात कामाला लागली अाहे.


  जान्हवी प्रशांत पाटील (वय ४, रा. संभाजी चौक) असे मृत झालेल्या बालिकेचे नाव अाहे. ती अाजारी असल्याने अाकाशवाणी चाैकाजवळील लहान मुलांच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले हाेते. दरम्यान, प्रकृती गंभीर असल्याने जान्हवीला पिंप्राळा रस्त्यावरील एका रुग्णालयात बुधवारी दुपारी हलवण्यात अाले हाेते. उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास जान्हवीचा मृत्यू झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी प्रमाणात असला तरी डेंग्यूचा पहिला बळी गेल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली अाहे.


  साेनवणेंचा अायुक्तांशी संपर्क
  शहरात डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती कळताच माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शिवाजीनगरात जावून पाटील कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच या घटनेसंदर्भात अायुक्त चंद्रकांत डांगे यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे साथ निर्मूलन पथकाचे प्रमुख सुनील पांडे यांना तातडीने बाेलावून घेण्यात अाले. या वेळी परिसरातील भाजप नगरसेवक नवनाथ दारकुंडे, गायत्री उत्तम शिंदे, किशोर बाविस्कर हे देखील उपस्थित होते. काही वेळातच आमदार सुरेश भोळे हे देखील शिवाजीनगरात दाखल झाले. त्यांनी मृत बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, मृत बालिकेच्या कुटुंबियांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार अाहे. सतर्कता म्हणून महापालिकेच्या अाराेग्य विभागाने शिवाजीनगर परिसरातील संभाजी चाैकावर लक्ष केंद्रीत केले अाहे. गृहभेटी देऊन नागरिकांना मार्गदर्शक सुचना दिल्या जाताहेत.


  परिसरातील घरांची तपासणी करणे सुरू
  विमा क्षेत्रात कार्यरत प्रशांत पाटील यांची जान्हवी मुलगी असून ती बालवाडीत शिकत हाेती. खासगी रुग्णालयातर्फे करण्यात अालेल्या रक्ताच्या चाचणीत तिला डेग्यू एनएस-१ पाॅझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला हाेता. दरम्यान, बालिकेचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच पालिकेचे सुनील पांडे व सुधीर साेनवाल यांनी शहरातील सर्व ८० कर्मचाऱ्यांना एकाच भागात बाेलावून घेत फवारणी, अॅबेटिंग तसेच घरांचे सर्वेक्षण सुरू केले.


  खासगी संस्था करणार धुरळणी
  डेंग्यू नियंत्रणासाठी गेल्या वर्षाप्रमाणेच यंदादेखील स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवाजीनगरात सायंकाळी धुरळणी केली जाणार अाहे. माजी नगरसेवक कैलास साेनवणेंनी यंदादेखील शहरातील ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण अाढळतील त्या ठिकाणी स्वखर्चाने धुरळणी करणार असल्याचे सांगितले.


  महासभेत ठरणार सफाईचे धाेरण
  शहरात साफसफाई व्यवस्थित हाेत नसल्याने अायुक्तांनी प्रभाग निहाय ठेके रद्द करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे महापाैर निवडीनंतर हाेणाऱ्या महासभेत यासंदर्भात धाेरण ठरवले जाणार अाहे. एकमुस्त पध्दतीने साफसफाईचा ठेका देण्याचा प्रयत्न असल्याचे अायुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले.


  मृताच्या कुटुंबीयांचे रक्ताचे नमुने घेणार
  शहरात डेंग्यू सदृष्य अाजाराने सुमारे १०० पेक्षा जास्त रुग्ण अाढळून अाले अाहेत. पालिकेकडे अातापर्यंत सुमारे ७० रुग्णांची नाेंद करण्यात अाली अाहे. शहरातील डेंग्यू सदृश ६८ रुग्णांचे नमुने अाैरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात अाले हाेते. त्यापैकी १७ नमुने डेंग्यू पाॅझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला अाहे. दरम्यान, मृत बालिकेच्या कुटुंबातील सदस्यांचे देखील दाेन दिवसात रक्ताचे नमुने घेण्यात येणार अाहेत.

Trending