आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात अाईच्या वाढदिवशीच चार वर्षीय मुलीवर काळाची झडप 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी | जळगाव : हाेशिंगाबाद येथील कुटुंबीय जळगावात वाढदिवस साजरा करून भुसावळकडे जात असताना खेडी पुलाजवळ भरधाव डंपरने त्यांच्या कारला जाेरदार धडक दिल्याने रात्री ११ वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात अाईच्या वाढदिवशी चार वर्षीय बालिकेला प्राण गमवावे लागले तर अाईवडिलांसह तिचे मामा व बहीण असे चार जण जबर जखमी झाले.    स्वरा उर्फ सुहरा गाैतम मनवाणी (वय ४ वर्ष) असे मृत बालिकेचे नाव अाहे. गाैतम सन्मुखदास मनवाणी (वय ३८), क्रितिका गाैतम मनवाणी (वय ३३), माही गाैतम मनवाणी (वय ६) व वैभव मुलचंदानी (वय ३०) असे या अपघातात जखमी झालेल्यांची नावे अाहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. मनवाणी कुटुंबीय हाेशिंगाबाद येथून अाले हाेते. गाैतम मनवाणी हे त्यांची पत्नी क्रितिका, दाेन मुली माही, सुहरा व शालक वैभव यांच्यासह कारने (एमएच-१९, बीजे-९६८) जळगाव येथे अाले हाेते. शनिवारी क्रितिका यांचा वाढदिवस हाेता. त्यांचा वाढदिवस जळगाव येथे हाॅटेलमध्ये जेवण व चित्रपट बघून साजरा केला. त्यानंतर सर्व कुटुंबीय कारने भुसावळकडे चालले हाेते. दरम्यान, खेडी गावाजवळ हाॅटेल गाैरव समाेरील पुलावर समाेरून येत अालेल्या भरधाव डंपरने (एमएच-२१, एक्स-५१९३) त्यांच्या कारला समाेरुन जाेरदार धडक दिली. यात कार पुलाजवळील नाल्यात पडली. अपघातानंतर चालक डंपर घटनास्थळी साेडून पसार झाला. कारच्या सीटाखाली अाल्याने चार वर्षीय सुहराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी बारी यांच्या माहितीवरून एमअायडीसी पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली. मनवाणी कुटुंबीय मूळचे भुसावळ येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. या अपघाताची माहिती मिळताच जळगाव शहरातील सिंधी समाजबांधवही मदतीसाठी धावले.    डंपरच्या धडकेत कारचे झालेले नुकसान व शेजारील छायाचित्रात जखमी माहीला रुग्णालयात नेताना युवक.    जखमी करीत हाेते मदतीची याचना मात्र नागरिक काढत हाेते फाेटाे!  कार कलंडलेल्या नाल्यात पाणी हाेते. जखमी मनवाणी कुटुंबीय वेदनेने विव्हळत असताना नागरिकांना मदतीची याचना करीत हाेते. रस्त्याने येणारे वाहनचालक वाहने थांबवून या अपघाताचे फाेटाे काढत हाेते; परंतु मदतीला कुणी धावून अाले नाही. या वेळी खेडी येथील मंगल गजानन सूर्यवंशी, याेगेश चंदुलवार, हर्षल शिवाजी भावसार या युवकांनी जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली. या वेळी याेगायाेगाने भुसावळकडून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका येत हाेती. युवकांनी ती रुग्णवाहिका थांबवली. अपघातामुळे कारचे दरवाजे उघडत नव्हते. त्यामुळे युवकांनी कारचे दरवाजे ताेडूून जखमींना बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी मिलिंद बारी यांनी सुहरा हिला तपासून मृत घाेषित केले. त्यानंतर जखमींना खासगी रुग्णालयात हलवण्यात अाले.   

बातम्या आणखी आहेत...