आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलॉन मांजामुळे चारवर्षीय चिमुकलीचा गाल फाटला, गालावर पडले वीस टाके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : वडिलांसोबत दुचाकीवरून खरेदीसाठी जाणाऱ्या चारवर्षीय चिमुकलीचा तोंडावर नायलॉन मांजा अडकून गाल फाटल्याची घटना २५ जानेवारी रोजी चेलीपुरा परिसरात घडली. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी पोलिस आयुक्तांना निवेदन देत नायलॉन मांजावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

 

आयशा मोहंमद (४, रा. शहानूरवाडी) हिच्या मोठ्या बहिणीच्या शाळेत स्नेहसंमेलन असल्याने तिला राणी लक्ष्मीबाईच्या वेशभूषेसाठी कपडे खरेदी करायचे होते. त्यासाठी दोघी बहिणी वडील मोहंमद जावेद यांच्यासोबत दुचाकीने खरेदीसाठी जात होत्या. तेव्हा चेलीपुऱ्यातील टुटीची मशीदजवळ अचानक तिच्या गळ्यात व तोंडाला नायलॉन मांजा अडकला अन् गाल फाटला गेला. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या गालावर वीस टाके पडल्याचे तिचे वडील जावेद यांनी सांगितले. 


बंदी असतानाही विक्री : 
नायलॉन मांजा विक्री करण्यावर बंदी असतानाही शहरात सर्रास विक्री सुरू असल्याचे या घटनेनंतर पुन्हा एकदा समोर आले आहे. महिनाभरात पाचपेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...