आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकाने 4थीत शिकणाऱ्या मुलला केली मारहाण, 3 दिवस पायावर होते वळ...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांकेर(छत्तीसगढ)- एका खासगी शाळेतील शिक्षकाने गृहपाठ केला नाही म्हणून 4 थीत शिकणाऱ्या मुलाला निर्दयीपणे मारले आहे. पायावरचे वळ पाहून मुलाच्या पालकांनी शाळेत जाऊन त्या शिक्षकाला खडे बोल सुनावले. रात्रीभर मुलाला त्रास झाला म्हणून दुसऱ्या दिवशी पालकांनी, एसडीएम आणि डीईओकडे तक्रार दाखल केली. 

 

त्रास सहन नाही झाला म्हणून रडत-रडत आईला सांगितला घडलेला प्रकार

पोलिसांनी शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकाला ठाण्यात बोलवले, तेथे त्यांना खुप खडे बोल सुनावण्यात आले. नंतर शाळेने माफी मागून प्रकरण मिटवले. पण एसडीएम आणि डीईओकडे तक्रार केल्यानंतर तपास केला जात आहे. एसडीएमने प्रकरणाच्या तपासासाठी ३ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. बाल संरक्षण अधिकारीही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तेथे गेले. 3 डिसेंबरला लाइफ अकेडमी स्कूलमध्ये होमवर्क केले नाही म्हणून शिक्षक एडिसन जी. एलिएसने चौथ्या वर्गात शिकणाऱ्या आशुतोष अग्रवालला मारले. लंगडत-लंगडत तो घरी गेला तेव्हा त्याने रडत-रडत आईला सगळी घटना सांगितली. शरीरावरचे वळ पाहून पालक आक्रमक झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी एसडीएम, डीईओ आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


गृहपाठ हिंदीच्या शिक्षकाचा केला नाही पण गणिताच्या शिक्षकाने मारले

बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास केल्यावर कळाले की, ज्या शिक्षकाने मारले होते ते गणित-विज्ञानचे शिक्षक आहेत पण मुलाने हिंदी-इंग्रजीचा गृहपाठ केला नव्हता. मुलाचे वडील संजीव अग्रवालने मुलाची वही तपासल्यावर कळाले की, त्याची वही मागच्या एका महिन्यापासून चेकदेखील केली नव्हती. 


मुलाला पहिले गुडघ्यावर बसवले आणि मागून त्याला काठीने मारले, तो खुप ओरडला, रडला पण कोणीच त्या शिक्षकाला अडवले नाही. या प्रकरणानंतर शिक्षकाने आणि मुख्याध्यापकाने माफी मागितली आहे, आणि त्या शिक्षकाला 10 दिवसासाठी निलंबीत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...