Home | Sports | From The Field | Fourth test / first dauy : England first innings 246 run

भारतीय युवा गाेलंदाजांमुळे इंग्लंडची उडाली दाणादाण! इंग्लंड संघ पहिला डाव २४६ धावा

वृत्तसंस्था | Update - Aug 31, 2018, 08:15 AM IST

गतविजयाने जबरदस्त फाॅर्मात अालेल्या भारतीय संघाच्या युवा गाेलंदाज जसप्रीत बुमराह अाणि माे. शमीने गुरुवारी चाैथ्या कसाेट

  • Fourth test / first dauy : England first innings 246 run

    साऊथम्पटन- गतविजयाने जबरदस्त फाॅर्मात अालेल्या भारतीय संघाच्या युवा गाेलंदाज जसप्रीत बुमराह अाणि माे. शमीने गुरुवारी चाैथ्या कसाेटीच्या पहिल्या डावात यजमान इंग्लंड संघाला माेठा धक्का दिला. बुमराहने ३ विकेट घेतल्या. तसेच इशांत, शमी अाणि अार. अश्विनने प्रत्येकी २ बळी घेतले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान इंग्लंड संघाने पहिल्या दिवशी पहिल्या डावात २४६ धावांवर अापला गाशा गुंडाळला. इंग्लंडकडून सॅम कुरनने (७८)अर्धशतक ठाेकले.


    प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात दिवसअखेर गुरुवारी बिनबाद १९ धावा काढल्या. अाता शिखर धवन (३) अाणि लाेकेश राहुल (११) हे दाेघे मैदानावर खेळत अाहेत. अाता २२७ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताकडे १० विकेट शिल्लक अाहेत.


    इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, कर्णधार ज्याे रुटचा हा निर्णय भारताच्या युवा गाेलंदाज बुमराह अाणि शमीने साफ चुकीचा ठरवला. त्यामुळे इंग्लंडला ४ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या ३६ धावा काढता अाल्या. त्यानंतरही टीमला अापली पडझड थांबवता अाली नाही. यातूनच पुन्हा दाेन विकेट पडल्या. जेनिंग्स हा अाल्यापावलीतच पॅव्हेलियनमध्ये परतला. ज्याे रुटने ४ अाणि बैयरस्ट्राेने ६ धावांची खेळी केली.

Trending