Home | Business | Auto | fourwheelar company gets biger offer for increasing sale

कारवर मिळणार आता मोठा डिस्काऊंट, विक्री वाढविण्यासाठी कंपन्यांची शक्कल

agency | Update - May 30, 2011, 11:49 AM IST

मागील काही महिन्यापासून चारचाकी गाड्यांची जोरदार विक्री होत असली मे महिन्यात कारविक्रीचा आकडा घसरला आहे. भारतीय कार बाजारातही त्याचे पडसाद उमटले असून भारतातही मे महिन्यात तब्बल १० टक्क्यांनी कमी कार विकल्या आहेत.

  • fourwheelar company gets biger offer for increasing sale

    car_288मागील काही महिन्यापासून चारचाकी गाड्यांची जोरदार विक्री होत असली मे महिन्यात कारविक्रीचा आकडा घसरला आहे. भारतीय कार बाजारातही त्याचे पडसाद उमटले असून भारतातही मे महिन्यात तब्बल १० टक्क्यांनी कमी कार विकल्या आहेत. त्यामुळेच डिलर यांच्याकडे गाड्यांची रांगच-रांग लागली असून ही रांग कमी करण्यासाठी कार कंपन्या पुढील महिन्यात ग्राहकांना खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट अॉफर देण्याचा विचार करत आहे. कंपन्याचं असं म्हणणं आहे की, एप्रिल-मे मध्ये कमी कार विकल्या गेल्याचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे पहिल्या तिमाईच्या चांगल्या आकडेवारीसाठी अशा योजना राबवायलाच हव्यात. यासाठी ग्राहकांना डिस्काऊंटमध्ये कार विकणे हाच पर्याय असल्याचे कंपन्यांना माहित असल्याने त्यांनी हा फंडा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीची कंपनी मारुती सुझूकी स्विफ्ट डिझायर गाडी सोडून सर्व चारचाकी गाडीवर डिस्काऊंट देत आहे. त्यांनी वॅगन-आर या गाडीवर ३५ हजाराची डिस्काऊंट आॅफर ठेवली आहे. याशिवाय त्यांनी जुन्या गाड्यासाठी एक्सचेंज स्किम चालू केली असून त्याबद्दल काही प्रमाणात सूट देत आहेत.
    हो़डांईने आपल्या आय-१० या गाडीवर ३९ हजाराची सूट देऊ केली आहे. महिंद्रा कंपनीने झायलो गाडीवर ४२ हजाराची सूट तर टाटा मोटारने आपल्या व्हिस्टा (पेट्रोलवरील) गाडीवर ५० हजार रुपये डिस्काऊंट देण्याची घोषणा केली आहे. तसेच लक्झरी कार बनविणाऱया कंपन्यांनी ग्राहकांना आकषिर्त करण्यासाठी नवीन वेगवेगळ्या आकर्षक स्किम काढल्या आहेत. तर, मग घ्यायची का एखादी झकास कार.....Trending