Home | National | Delhi | France freezes assets of Jaish e Mohammed chief masood azhar

‘जैश’च्या मालमत्तांवर फ्रान्स सरकारची टाच, मसूद अझहरभोवती इतर मार्गाने फास आवळणे सुरू

वृत्तसंस्था | Update - Mar 16, 2019, 09:25 AM IST

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर चीनने व्हेटो वापरून अभय

  • France freezes assets of Jaish e Mohammed chief masood azhar

    पॅरिस/ नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेविरुद्ध जागतिक स्तरावर फास आवळण्यास प्रारंभ झाला आहे. फ्रान्स सरकारने या संघटनेच्या त्यांच्या देशातील मालमत्ता व संपत्ती जप्त करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.


    संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर चीनने व्हेटो वापरून अभय दिले होते. मात्र, त्याच वेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतर महत्त्वाच्या सदस्य देशांनी मसूदवर कारवाईसाठी इतर मार्गांचा अवलंब केला जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार फ्रान्सने हा निर्णय घेतला. दरम्यान, मसूदचे नाव युरोपीय संघाच्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याबाबत चर्चा केली जाईल, असेही फ्रान्स सरकारने म्हटले आहे.


    २१ देश भारताच्या पाठीशी : दरम्यान, दहशतवादविरोधी लढाईत जैश-ए-मोहंमद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरविरुद्ध जागतिक स्तरावर कारवाई करण्यासाठी २१ देश भारताच्या पाठीशी असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. यूपीएच्या काळात भारत एकटा होता, असेही त्या म्हणाल्या.

Trending