आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्स : स्थलांतरितांनीच बदलले स्थलांतरग्रस्त जगातील शेवटचे चमोल-ले- चेतो गावाचे रूप, शाळा-रुग्णालय पुन्हा सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कारखाना बंद झाल्याने झाले स्थलांतर, गावात राहिले १८० लोक, आता आहेत ३००
  • मुलांचे शिक्षण, आरोग्यासारख्या मुद्द्यांवर एकत्र येत करतात मदत

पॅरिस - फ्रान्समधील चमोल- ले- चेतो गाव जगातील शेवटचे गाव मानले जाते. येथे आयुष्य फार कठीण आहे. बर्फाळ हवा, सामसूम परिसर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व इतर सोयी नसल्याने अनेक अडचणी येतात. १० वर्षांपूर्वी गाव स्थलांतरामुळे अस्वस्थ होते आणि केवळ १८० लोक राहिले होते. मात्र, स्थलांरीतांना गावाचे रूप बदलले. स्थलांतर थांबले आहे. गावकऱ्यांनी लहान दुकाने सुरू केली आहेत. रुग्णालय, शाळा पुन्हा सुरू झालेत. शाळेतील ४६ मुलांमध्ये १६ स्थलांतरित आहेत.

महापौर मायकल नोव्हेल यांनी सांगितले की, गावातील एकमेव डेअरी फॅक्टरी बंद झाल्याने स्थलांतर सुरू झाले. सोयी कमी होत्या. यामुळे ग्रामस्थांनी स्थलांतरितांसाठी दरवाजे खुली केली. ते येथे राहावेत म्हणून प्रोत्साहन दिले. आज येथील ३०० लोकांपैकी २०% स्थलांतरीत आहेत. हे लोक सिरिया, सुडान, लातव्हिया आणि आयव्हरी कोस्ट सारख्या देशातून आले आहेत.बातम्या आणखी आहेत...