आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मेरिनेक (फ्रान्स) | शत्रूंसाठी काळ ठरणारे लढाऊ राफेल विमान दसऱ्याच्या मुहूर्तावर भारताला मिळाले. फ्रान्सच्या मेरिनेक हवाई तळावर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत डॅसे एव्हिएशनने हे विमान भारतीय हवाई दलाकडे सोपवले. संरक्षणमंत्र्यांनी राफेलची (आरबी ००१) शस्त्रपूजा केली. नारळ, फुले वाहून मिठाईचा नैवेद्यही दाखवला. विमानाच्या टायरखाली लिंबे ठेवण्यात आली. त्यांनी फ्रान्सच्या पायलटसह ३० मिनिटे राफेलमधून उड्डाण केले.
- फ्रान्सकडे सध्या १८० राफेल. भारत ३६ खरेदी करत आहे. इजिप्त व कतार २४-२४ खरेदी केले आहेत. - मे २०२० पर्यंत ४ राफेल भारतात दाखल. सप्टेंबर २०२२ पर्यंत सर्व ३६ विमाने भारताला मिळतील.
आज दसऱ्याच्या मुहूर्तावर आणि ८७व्या वायुसेनादिनी राफेलसारखे अत्यंत शक्तिशाली लढाऊ विमान भारताला मिळाले. राफेलचा अर्थ वादळ... या विमानामुळे हवाई दलाची शक्ती निश्चितपणे वाढेल. - राजनाथसिंह, संरक्षणमंत्री
दहशतवादाशी निपटण्यासाठी भारत सरकारने बदललेली भूमिका हवाई हल्ल्यांतून स्पष्ट दिसली आहे. यातून भारताविरुद्ध षड्यंत्र रचणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, हा संकल्प दिसतो. - आरकेएस भदौरिया, हवाई दल प्रमुख
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.