आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सची आरामदायी मॅरेथॉन : ज्यात खाता-पिता धावावे लागते; ३५ वर्षांपासून होतेय मॅरेथॉन; ८५०० लोकांनी घेतला सहभाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस । आतापर्यंत आपण मॅरेथॉनसाठी लोक वर्षानुवर्षे तयारी करतात आणि कमीत कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. फ्रान्समध्ये प्रत्येक वर्षी वेगळ्या प्रकारची आरामदायी मॅरेथॉन होते. नाव आहे,

 

मॅरेथॉन डू मेडोक. 
या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे, यात धावपटू जितका आराम करायचा करू शकतात, मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. ४२ किमी मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी धावपटूंजवळ ६ तास वेळ दिला जातो. म्हणजे एका तासात ६ किमी धावले तरी सहज मॅरेथॉन पूर्ण होते. धावपटू जेथे थकला, तेथे थांबू शकतो व तेथे खाण्यापिण्याची सुविधा मिळते. मॅरेथॉनच्या संपूर्ण मार्गावर ब्रेड, पनीर, टोस्ट, फळे, नाष्टा आणि वाइनदेखील मिळते. धावपटू आपल्या बॅगमध्येदेखील खाण्याचे पदार्थ घेऊ धावू शकतात. साऊथ-वेस्ट फ्रान्समध्ये १९८५ मध्ये प्रत्येक वर्षी मॅरेथॉन डू मेडोक आयोजित केली जाते. लोकांनी एक दिवस कोणत्याही दबावाशिवाय काम पूर्ण केले पाहिजे, असा या मॅरेथॉनचा उद्देश आहे. या शर्यतीत लोकांना आपल्या आवडत्या पोशाखात येण्याची मुभा आहे. मॅरेथॉनसाठी ६८०० रुपये नोंदणी शुल्क आहे.  

बातम्या आणखी आहेत...