आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्स : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधातील आंदोलनानंतर आता शैक्षणिक सुधारणेसाठी विद्यार्थीही रस्त्यावर; २८० शाळांत निदर्शने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- फ्रान्समधील इंधन दरवाढीचे आंदोलन अजूनही थांबलेले नाही. शुक्रवारी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुधारणेसाठी आंदोलनात उडी घेतली. देशातील सुमारे २८३ शाळांतील विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोध दर्शवताना देशभरात ठिकठिकाणी निदर्शने केली. 

 

अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. तेव्हा सुरक्षा दलासोबत झालेल्या धुमश्चक्रीत किमान अनेक विद्यार्थी जखमी झाले. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे ४०० विद्यार्थ्यांना अटक केली आहे. अटकेत १२ वर्षीय मुलांचाही समावेश आहे.  विद्यार्थ्यांवर अटकेची कारवाई करणाऱ्या फ्रान्सच्या इमॅन्यूएल मॅक्रोन सरकारवर टीका केली जात आहे. हिंसाचार आणखी वाढण्याची भीती लक्षात घेऊन देशभरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राजधानी पॅरिसमध्ये सुरक्षेसाठी ७ हजार जवान तैनात केले आहे. गृहमंत्री क्रिस्टोफ कॅस्नर म्हणाले, येलो व्हेस्ट निदर्शकांनी स्वत: दानव असल्याचे सिद्ध केले आहे.

 

दडपशाही : पोलिसांनी ५० किमी अंतरावर आंदोलकांना ठेवले आेलीस
पोलिस विद्यार्थी आंदाेलकांवर अन्याय करत आहेत. त्याचा व्हिडिआे व्हायरल झाला आहे. त्यात किशोरवयीन विद्यार्थ्यांना आेलिस ठेवलेले दिसते. त्यांचे हात बांधलेलेही दिसतात. त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अत्याचारामुळे सोशल मीडियावर फ्रान्स सरकारवर टीका होत आहे.

 

राजधानी पॅरिसमध्ये आणीबाणीसारखी स्थिती, देशभरात सुरक्षा कडक
> शनिवारी विकेण्ड असल्याने पुन्हा निदर्शने होण्याची शक्यता. त्यामुळे ८९ हजार सैनिक तैनात. 
> निदर्शनातील हिंसाचाराचा मुकाबला करण्यासाठी ७५ हजारावर सैनिक सज्ज. 
> राजधानी पॅरिसमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ८ हजार सैनिक तैनात
> येलो वेस्टचे देशभरात केवळ १० हजार अधिकृत सदस्यांच्या नोंदणीचा सरकारचा दावा.

 

देशात गृहयुद्धासारखी स्थिती, १६ महिन्यानंतरही आश्वासनांची पूर्तता नाहीच

फ्रान्समध्ये जनतेच्या आक्रोशामागे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन यांची आश्वासने आहेत. त्यांनी निवडणूक प्रचार काळात अनेक आश्वासने दिली होती. देशात आर्थिक वृद्धी करू, राजकीय परिवर्तन आणले जाईल, कनिष्ठ वर्गातील लोकांना विकासात सहभागी करून घेतले जाईल. इत्यादी आश्वासने देण्यात आली होती. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केले होते. राष्ट्रपती झाल्यानंतर १६ महिने उलटूनही त्यांच्या सत्ताकाळात देशात काहीही परिवर्तन झाले नाही. उलट मॅक्रॉन यांनी इंधनावरील कर वाढवला. त्यावरून लोक नाराज आहेत. संतप्त लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत. सरकार त्याकडे दुर्लक्ष करू लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...