आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकी गाडी घेण्यासाठी कर्ज काढून देतो म्हणून दोन लाख 80 हजारांची फसवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चारचाकी गाडी घेण्यासाठी तत्काळ कर्ज काढून देतो, असे आमिष दाखवून २ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्याविरोधात २० डिसेंबर रोजी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अशोक भाऊराव जाधव (४३, रा. सारा वैभव, जटवाडा रोड) यांचा प्रतीक टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांना कवी दलमान प्रधान (रा. रामचंद्रनगर) याने डेल्टा सर्व्हिस कंपनीकडून क्रेटा ही १२ लाख रुपये किमतीची चारचाकी घेऊन देतो, असे आमिष २७ जानेवारी २०१८ रोजी दाखवले होते. त्यासाठी लागणारे कर्ज काढून देतो, मात्र, या रकमेचा चौथा हिस्सा २ लाख ८० हजार रुपये मला द्यावे लागतील, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून जाधव यांनी प्रधानला पैसे दिले. मात्र वर्ष झाले तरी गाडी आणि पैसे परत मिळाले नाहीत. पैसे मागितले असता शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...