आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनावट ई-मेलवरून तरुणास बँकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष; 93 हजारांची फसवणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तरुणास बँकेत नोकरी मिळवून देण्यासाठी बनावट ई-मेल तयार करुन भामट्याने त्याची ९३ हजार रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शनिवारी सायबर क्राईम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

 

सचिन संजय मराठे (वय २५, रा. म्हसावद, ता. जळगाव) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. सचिन हा एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. दरम्यान, भामट्यांनी त्याच्या ई-मेल आयडी वर बनावट मेल पाठवून एचडीएफसी बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. त्यानंतर या भामट्यांनी २२ ऑगस्ट २०१८ ते २२ ऑक्टोबर २०१८ दरम्यान सचिनला वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून नोकरीची माहिती दिली. रवि सिंग, करण भातपूर, करण लुन्ना, अनिल सिंग व श्रेया अशा नावांनी भामटे फोन करत होते. नोकरीचे आमिष दिल्यानंतर भामट्यांनी वेगवेगळ्या कारणांनी सचिनकडून ९३ हजार रुपये घेतले. यानंतर त्यांनी संपर्क बंद केला. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सचिनने सायबर क्राईम पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला.