आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंट्रल जेलला कापूस पुरवणाऱ्या ठेकेदाराला दहा लाखांना गंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मध्यवर्ती कारागृहात कापूस पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला मध्य प्रदेशातील कापूस वितरकाने पाॅलिस्टरमिश्रित कापूस पुरवून ९ लाख ७० हजारांना गंडा घालत कारागृह प्रशासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात कापूस वितरकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
मनोज उबराणी (रा. मोटवानीरोड, नाशिकरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०१७ मध्ये कारागृहाचे कापूस पुरवठा करण्याचे टेंडर निघाले होते. उबराणी हे शासकीय पुरवठादार असल्याने त्यांनी टेंडर भरले. दरपत्रकानुसार उबराणी यांना कापसाचा दोरा ६ एस ग्रे कॉटन पुरवठा करण्याचे टेंडर मिळाले. मध्यप्रदेशातील इंदूर येथील व्हाइट गोल्ड एजन्सीचे संशयित संचालक श्वेतल ए. जैन यांच्याकडून ९ लाख ७० हजारांचा कापूस दोरा त्यांनी खरेदी केला व ताे कारागृहाला पुरवला. कारागृह प्रशासनाने शासकीय क्वालिटी कंट्रोल अधिकाऱ्यांकडून या कापसाचा दर्जा तपासला असता, त्यात ३३ टक्के पॉलिस्टर असल्याचे उघडकीस आले.

प्रशासनाने निकृष्ट दर्जाचा कापूस दोरा उबराणी यांनी परत दिला. उबराणी यांनी जैन यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी माल परत घेण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याने उबराणी यांनी पोलिसांत धाव घेतली. संशयित एजन्सीच्या संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...