आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेत थेट नियुक्तिपत्र देण्याचे अामिष दाखवून उकळले 35 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेत नाेकरीचे अामिष दाखवित काही बेराेजगारांना थेट नियुक्तिपत्र देत फसवणूक केल्याप्रकरणी पंचवटी पाेलिसांनी अटक केलेल्या मनपाचाच सफाई कर्मचारी सचिन सूर्यवंशी याने अाणखी अाठ ते दहा जणांकडून पैसे उकळत तब्बल ३५ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समाेर अाला अाहे. या प्रकरणात पाेलिसांच्या अावाहनानुसार पहिल्याच दिवशी अाठ तक्रारदार समाेर अाले अाहे.

 

पंचवटीतील रहिवासी प्रमिला बागूल यांच्या तक्रारीनुसार, पालिकेच्या स्लम विभागात नाेकरीस असलेल्या संशयित सचिन जिभाऊ सूर्यवंशी (रा. दत्तनगर, पेठराेड) याने पालिकेत नाेकरीला लावून देण्याचे अामिष दाखविले हाेते. बनावट नियुक्तिपत्रे देत प्रत्येकी अाठ लाख रुपये घेतले हाेते. यासदर्भात संशयित सूर्यवंशी याच्याकडे पैशांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देत पैसे देण्यास टाळाटाळ केली. पाेलिसांत धाव घेताच संशयित सूर्यवंशी यास अटक करण्यात अाली असून त्यास पाेलिस काेठडी सुनावली अाहे.

 

दरम्यान, या प्रकरणात तक्रारदारांची संख्या अाणि फसवणुकीचा अाकडाही वाढत अाहे.

बातम्या आणखी आहेत...