आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना कर्जाचे आमिष देत 15 ते 20 लाखांचा गंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अवघा 1 टक्का दराने 50 हजारांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवत मोलमजुरी करणाऱ्या झोपडपट्टी भागातील हजारो महिलांना तब्बल पंधरा ते वीस लाखांना गंडा घातल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांविरोधात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

 

पोलिसांनी दिलेली माहिती आणि मेघा गायकवाड (गंगापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित विजय सोनवणे आणि त्याचा मित्र अमित या दोघांनी दोघे मल्हार खान परिसरात सावरीय मायक्रो फायनान्स कंपनी नावाने कार्यालय थाटले. सक्षम बनवण्याच्या नावाखाली 1 टक्का दराने महिलांना 50 हजारांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवले. महिलांकडून 150 रुपये घेत फॉर्म भरून घेतला. तसेच कर्ज मंजुरीसाठी बँकेत तारण म्हणून प्रत्येकी 2 हजार रुपये जमा केले. गायकवाड यांच्यासह परिसरातील शेकडो महिलांनी प्रत्येकी 2015 रुपये कंपनीमध्ये भरले.  

बातम्या आणखी आहेत...