आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात तरुणीला ऑनलाइन गंडा.. क्लब फॅक्टरी वेबसाईटवरील बूट पडाला 77 हजारांत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ऑनलाइन बूट खरेदी करताना एका तरुणीला ७७ हजारांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सिंहगड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने क्लब फॅक्टरी या संकेतस्थळावर एक बूट आवडल्याने तिने ऑनलाइन खरेदी करण्यासाठी डेबिट कार्डद्वारे १ हजार ४४९ रुपयांचे पेमेंट केले. यानंतर ऑर्डर पूर्ण झाल्याचा संदेश न आल्याने तिने कस्टमर केअरला संपर्क साधला. तेव्हा तिच्याकडून डेबिट कार्डची गोपनीय माहिती विचारून घेण्यात आली. त्यानंतर काही वेळातच तिच्या खात्यावरून ७७ हजार २३१ रुपये काढून घेतल्याचा संदेश आला. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली. दुसऱ्या एका घटनेत अशा प्रकारेच ज्येष्ठ नागरिकाला १ लाख ६७ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला.

 

बातम्या आणखी आहेत...