आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन दिवसांसाठी दागिने घेतले अन् गहाण ठेवून उचलले लाखाचे कर्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नातेवाइकांच्या लग्नाचे कारण सांगून दोन दिवसांसाठी दागिने मागितले. मनप्पुरम गोल्डमध्ये दागिने गहाण ठेवून १ लाख ९ हजार रुपयांचे कर्ज घेऊन पळून गेले. असा प्रकार जोडभावी पेठ पोलिस ठाण्यांतर्गत घडला असून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

मल्लिनाथ नागप्पा परशेटी (वय ५४, रा. रामराज्य नगर, शेळगी) यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या (मूळचा कर्नाटक गोकाक) महादेव सीताराम शिवशेट्टी याने फसवणूक केली. मेव्हण्याच्या साखरपुड्यासाठी गुलबर्गा येथे जायचे आहे, माझ्या पत्नीच्या अंगावर सोने नाही, तरी दोन दिवसांकरिता तुमच्या पत्नीचे दागिने द्या, अशी विनंती शिवशेट्टी याने केली.

 

मल्लिनाथ यांनी एक लाख ७३ हजार रुपयांचे दागिने महादेव यास दिले. २४ ऑगस्ट २०१८ रोजी सिटी हॉस्पिटल येथील मनप्पुरम गोल्डमध्ये शिवशेट्टी याने सोने गहाण ठेवले. त्या बदल्यात १ लाख ९ हजार रुपयांचे कर्ज घेऊन पळ काढले, अशी फिर्याद मल्लिनाथ परशेटी यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात ५ जानेवारी रोजी दाखल केली. यावरून महादेव शिवशेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.