आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OLX कार खरेदी करण्यापूर्वी बाळगा सावधगिरी, नवीन कार दाखवून ग्राहकांना बनवत होते मूर्ख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - OLX वर नवीन कार विकण्याचे आमिष दाखवत एक टोळी अत्यंत हुशारीने ग्राहकांना शिकार बनवत आहे.


नोएडा पोलिसांनी रविवारी या टोळीच्या एका सदस्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर या फसवेगिरीचा खुलासा झाला. ही टोळी नवीन कारला 2 लाख रूपयांत विकण्याचे आमिष देत खरेदीदाराला नोएडा किंवा अन्य शहरात बोलावतात आणि त्याच्यासोबत व्यवहार करतात. पैसे घेतल्यानंतर गाडीच्या कागदपत्रांची फोटोकॉपी करण्याच्या बहाण्याने खरेदीदाराला कारमध्ये बसवून त्यांच्या सोबत जातात आणि रस्त्यात जीपीएसच्या मदतीने कार बंद करतात. यानंतर खरेदीदाराला गाडीला धक्का देण्याचे कारण सांगत खरेदीदाराला गाडीबाहेर काढतात. खरेदीदार बाहेर जाताच कार स्टार्ट करून पळून जातात. त्यानंतर त्यांचा मोबाइल सुद्धा बंद करतात.

 

आतापर्यंत 10 पेक्षा जास्त लोकांना फसविले 

नोएडा सेक्टर -39 भागातील पोलीसांनी या टोळीचा सदस्य आरोपी कृपाल सिंग याला अटक केली असून टोळीचा मुख्य सुत्रधार मनु त्यागी फरार आहे. पोलिस अधिकारी अमित सिंग यांनी सांगितले की, मुख्य आरोपी मनु याच्याकडे तीन कार आहेत. या गाड्यांना तो OLX विक्रीसाठी टाकतो आणि वेगवेगळ्या फोन नंबरद्वारे संपर्क साधून लोकांची फसवणूक करतो. त्याने आतापर्यंत नोएडा, गाझियाबाद, बुलंदशहर, हापुर आणि अशा अनेक शहरात त्यांनी 10 पेक्षा जास्त फसवणूकी केल्या आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...