आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FB वर मैत्री-परदेशात जाण्याचे स्वप्न पाहून मुलीच्या जाळ्यात अडकला नवरदेव, लग्नही केले पण स्वप्न हे फक्त स्वप्नच राहिले, सर्व काही लुटून पळून गेली नवरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगरुर न्यूज. ऑस्ट्रेलियामधील तरुणीने सुनील नावाच्या तरुणासोबत फेसबुकवर मैत्री केली. लग्न करुन विदेशात घेऊन जाण्याचे स्वप्न दाखवले. यासोबतच 10 लाख रुपये आणि दागिणेही लुबाडले. तरुणीने ऑस्ट्रेलियामध्ये नागरिकत्त्व मिळवून देण्यासाठी 20 लाख रुपये मागितले होते. तरुणाच्या कुटूंबियांनी आपल्या दोन दुकान विकून आणि नातेवाईकांकडून उधार घेऊन तरुणीच्या कुटूंबियांना 10 लाख रुपये दिले होते. यासोबतच या तरुणीने तिच्या यापुर्वी झालेल्या 2 लग्नाची गोष्ट या तरुणापासून लपवली होती. पोलिसांनी तरुणी आणि तिच्या भावाविरुध्द धूरी शहरात तक्रार दाखल केली आहे. 

 

सुनीलने तक्रार दिली की, 2016 मध्ये फेसबुकवर त्याची ऑस्ट्रेलियामध्ये राहणा-या शैलीसोबत मैत्री झाली. शैलीचे वडील विजय कुमार, भाऊ रुपेश धूरीमध्ये राहतात. शैलीसोबत नेहमीच फोनवर बोलणे व्हायचे. ती म्हणाली की, लग्नानंतर ती त्याला ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन जाईल, पण याचा सर्व खर्च तुला स्वतःला करावा लागले. अक्टोबर 2016 मध्ये शैली धूरी येथे आली. 

 

शैलीच्या कुटूंबियांनी अट ठेवली की, सुनील लग्नापुर्वी त्यांना 10 लाख रुपये देईल, यानंतर शैली त्याला ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन जाईल. ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यानंतर 10 लाख रुपये द्यावे लागतील. यानंतर शैली त्याला ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्त्व देईल. सहमतीनंतर 11 डिसेंबरला त्यांचे लग्न ठरले. लग्नाच्या काही दिवसांपुर्वी त्यांनी 10 लाख रुपये तिचे वडील आणि भाऊ रुपेश कुमार यांना दिले. यांचे लग्न हिंदू पध्दतीने झाले. लग्नामध्ये त्यांनी शैलीला 1 जोडी सोन्याचे कडे, 1 हार, 3 अंगठ्याही दिल्या. 

 

यापुर्वीही दोन लग्न करुन शैलीने घेतला होता घटस्फोट 
सुनील कुमारने सांगितले की, लग्नाच्या काही काळानंतर ते लग्नाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी डीसी ऑफिसमध्ये गेले. येथे शैलीच्या कागदपत्रांवरुन कळाले की, शैलीने यापुर्वी दोन लग्न करुन घटस्फोट घेतला होता. यानंतर त्याला मानसिक त्रास झाला, कारण शैलीने लग्नापुर्वी या गोष्टी स्पष्ट केलेल्या नव्हत्या. लग्नानंतर शैली जास्त काळ आपल्या माहेरीच राहिली. यादरम्यान तिने त्याला ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन जाण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत.

 

7 मे 2017 ला ती पुन्हा ऑस्ट्रेलियामध्ये गेली. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर ती त्याला 10 लाख रुपये मागत होती. तो म्हणाला की, आधी मला ऑस्ट्रेलियामध्ये येऊ दे पण शैली टाळत राहिली. याविषयी तो शैलीच्या कुटूंबियांशी बोलला, तर त्यांनीही जास्त लक्ष दिले नाही. शैली म्हणाली की, मी तुला ऑस्ट्रेलियामध्ये बोलवू शकत नाही. तु घटस्फोटाचा अर्ज दाखल कर मी माझ्या भावाला पावर ऑफ अटार्नी देऊन टाकेल. यासंबंधी मुलगा शैलीच्या भावाला बोलला तर तो घटस्फोटासाठी सहमत झाला आणि पैशांची मागणी करु लागला. 

 

बातम्या आणखी आहेत...