आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ALERT: ऑनलाइन मागवला होता 14 हजारांचा फोन, पार्सल उघडून पाहिले तर डोकं धरून बसला तरूण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डूंगरपूर - शहरात एका तरुणाला ऑनलाइन शॉपिंग करणे महागात पडले आहे. त्याने एका ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटद्वारे 14 हजार रुपयांचा एक मोबाइल ऑर्डर केला होता. पार्सल आल्यानंतर त्याने ते उघडून पाहिले तर डब्यात स्मार्टफोनऐवजी साबन निघाला. ते पाहून तरुण डोकं धरून बसला. त्यामुळे त्याची फसवणूक झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. 


ही घटना साबला येथील पिंडावलच्या रवींद्रबरोबर घडली आहे. त्याने 29 सप्टेंबरला अॅमेझॉन डॉट इनद्वारे ऑनलाइन मोबाइल बूक केला होता. RealMe One कंपनीचा मोबाईल 12 हजार 491 रुपयांचा आणि 6 टक्के जीएसटीसह त्याने 13 हजार 990 मध्ये पोन ऑर्डर केला होता. पिंडावलमध्ये अॅमेझनची डिलिव्हरी नसल्याने त्याने उदयपूरमध्ये अभ्यास करणारा त्याचा एक मित्र गौतमच्या पत्त्यावर मोबाइल मागवला. काही दिवसांपूर्वी गौतमच्या पत्त्यावर मोबाईल आला, तो तसाच फॅक त्याने रवींद्रला पाठवला. 


आनंद बदलला दुःखात 
- नवा मोबाईल आल्याने रवींद्र आनंदी होता. पण त्याने मोबाईलचा डबा उघडताच त्याच्यात मोबाईल ऐवजी साबण ठेवलेला होता. ते पाहून रवींद्र आणि गौतमला धक्काच बसला. त्यांचे 14 हजार रुपयेही गेले आणि फोनही गेला. तरुण आता ग्राहक न्यायालय आणि पोलिसांची मदत घेणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...