आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहितच्या फॅशन शोच्या नावावर सुरू होती फसवणूक, स्वत: केली तक्रार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

18 वर्षांपासून फॅशन डिझायनिंग मध्ये सक्रिय असलेल्या रोहित वर्माने मुंबईच्या सांताक्रुझ पोलिस स्टेशनमध्ये आपल्या नाववरुन काेणीतरी फसवणूक करत असल्याची तक्रार दिली आहे. दिल्ली गुन्हे शाखेकडेही त्याने मेल केला आहे. खरं तर, दिल्लीत कोणीतरी त्याच्या फॅशन शोच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करत असल्याची माहिती त्याला मिळाली होती.

रजिस्ट्रेशनच्या नावावर 2000 रुपये घेतले जात होते
दिव्य मराठीसोबत बोलताना रोहितने सांंगितले..., "मला जेव्हा कळाले तेव्हा मी सांताक्रुझ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. शिवाय दिल्ली गुन्हे शाखेलाही एक ईमेल केला. मला माहिती मिळाली होती की, दिल्लीत कोणीतरी माझ्या फॅशन शोच्या ऑडिशन च्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे. मात्र मी अशा कोणत्याच शोची बुकिंग केली नाही. हे लोक कोण आहेत याची मला माहिती नाही. माहिती मिळताच मी एका मित्राला फोन करायला लावला. तेव्हा कळाले, १५ सप्टेंबर राजी दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये मी एक फॅशन शो ठेवला आहे, ज्याच्या रजिस्ट्रेशनची फी २००० हजार रुपये आहे, तो कॉल मी रिकॉर्ड करून घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...