आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेचे कर्ज असलेल्या रो-हाउसची विक्री करणाऱ्या मालकावर फसवणुकीचा गुन्हा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक - बँकेचे कर्ज असलेल्या रो-हाउसचे बोगस साठेखत करुन ते परस्पर विक्री करून नऊ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मिळकत मालकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बँक कर्मचाऱ्यांनी मिळकत ताब्यात घेतली तेव्हा खरेदी करणाऱ्या तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. 


पोलिसांनी दिलेली माहिती अाणि पद्माकर कुलकर्णी (रा. सौभाग्यनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित रवींद्र परशराम ओझा (रा. जगताप मळा) यांनी २०१६ मध्ये सिद्धिविनायकनगर, विहितगाव, नाशिकरोड येथील त्यांच्या मालकीचे रो-हाउस नंबर ५ वर एचडीबी फायनान्स सर्व्हिसेस यांचा कर्ज तारण बोजा असल्याचे माहिती असूनदेखील लाभाच्या इच्छेने मे २०१८ मध्ये दस्त नोंदवत तसेच सातबारा उताऱ्यावर मिळकत बिनबोजाची असल्याचे भासवत नऊ लाख ५० हजारांचे साठेखत करारनामा केला. काही दिवसांनी बँकेचे कर्मचारी रो-हाउसचा ताबा घेण्यासाठी आले असता मिळकतीवर बोजा असल्याचे समजले. तसेच, सी व्यंकटेश देवस्थान यांची परवानगी घेतली नसल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुलकर्णी यांनी पोलिसांत धाव घेतली. 


संशयिताच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सहायक निरीक्षक के. एल. सोनोने यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...