आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना- शेतीचा वाद, ग्रामपंचायतमधील अतिक्रमण यासोबतच निवडणूकीत अडथळा ठरू नये म्हणून सात महिन्यांपासून सालगडी असलेल्याच्या आईला गावातील चार जणांनी बलात्कार केला म्हणून गुन्हा दाखल करायला लावला. यानंतर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेऊन खोलवर जाऊन तपास केला असता फिर्याद व आरोपांमध्ये तफावत दिसून आली. दरम्यान, फिर्याद देण्यासाठी मदत करणाऱ्या सात जणांपैकी काहींनी बलात्कार करून तो 'त्या' चार जणांवर गुन्हा दाखल होण्यासाठी हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले. या गुन्ह्यात ३६ तासांत ७ पैकी ५ आरोपी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या जलदगती तपासामुळे निरपराध असलेल्या चार जणांसह त्यांच्या कुटूंबियांना दिलासा मिळाला आहे.
जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथील एका जणाच्या शेतात पिडीत महिला तिच्या मुलासह राहते. तिचा मुलगा त्या शेतमालकाकडे सालगडी म्हणून सात महिन्यांपासून काम करत आहे. दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास जालिंदर बापुराव डोईफोडे, पंडीत आसाराम शिंदे, सुभाष नारायण सोमधने, साईनाथ शिवाजीराव गंडाळ (सर्व रा. अहंकार देऊळगाव) यांनी पिडीत महिलेच्या मुलाला घरात कोंडून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची तक्रार काही जणांच्या मदतीने दिल्यावरुन तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यात पोलिसांनी वरील चारही आरोपींना ताब्यात घेतले. दोन दिवस पोलिसांनी सखोल तपास करुन विचारपूस केली असता, फिर्यादी व आरोपींचे वास्तव्य व इतर साक्षीदारांच्या चौकशीत तफावत आढळून आली. सखोल तपासाअंती बाबासाहेब सदाशिव सोमधने याने इतरांच्या मदतीने महिलेला हा गुन्हा करण्यासाठी भाग पाडले असल्याचे समोर आले. पिडीत महिला त्याच्या मुलासह शेतात राहत होती. पत्नी गावात सरपंच असल्यामुळे वरील चार जणांशी सोमधने याचा वाद होता. त्या चारही जणांना धडा शिकविण्यासाठी मुलाला घरात कोंडून चार जणांनी बलात्कार केल्याची खोटी फिर्याद देऊन त्या चार जणांना या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न सुरु होता. पिडीत महिलेकडून हा गुन्हा करण्यासाठी बाबासाहेब सदाशिव सोमधाने (४३) याच्यासह देविदास सदाशिव सोमधाने (५५), कृष्णा मच्छिंद्र सोमधाने (२८), मच्छिंद्र नामदेव कबले (२३), परमेश्वर शंकर गंडाळ (४८), अर्जुन मच्छिंद्र सोमधाने, मनोहर मच्छिंद्र सोमधाने (सर्व रा. अहंकार देऊळगाव) यांनी गुन्हा करण्यासाठी मुख्य आरोपीस मदत केली. आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
सखोल बाजूने केला तपास
अत्यंत किचकट असलेला हा गुन्हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला. यात घटनास्थळ फिर्यादी-आरोपींमधील तफावत दिसून आल्याने तात्काळ तपास लागला आहे. साईनाथ ठोंबरे, पोलिस निरीक्षक, तालुका जालना.
सकाळी १० ते ७ पर्यंत ९ तास तपास
२१ नोव्हेंबर रोजी सातपैकी पाच आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर एएसपी समाधान पवार, डीवायएसपी ढवळे, पीआय ठोंबरे यांनी आरोपी, आरोपीसंबंधीत असलेले साक्षीदारांच्या नोंदी घेतल्या. सकाळी १० ते रात्री तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. तसेच घटनास्थळीही भेट देऊन या गुन्ह्यातील अनेक पुरावे गोळा केले आहेत. या पुराव्यांसाठी विविध खबरे जोडले होते. कपडे, घटनास्थळावरील पुरावे, हे उपयोगी पडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.