Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | fraud with youth in rahuri in the name of lucky draw

लकी ड्रॉच्या गोंडस नावाखाली राहुरीतील तरुणाची फसवणूक

प्रतिनिधी | Update - Aug 30, 2018, 09:45 AM IST

ऑनलाइन बुक केलेल्या मोबाइल पार्सलमध्ये चक्क धातूची मूर्ती व हळद-कुंकू देऊन एका महिलेने राहुरीच्या तरुणाला फसवले.

  • fraud with youth in rahuri in the name of lucky draw

    राहुरी शहर- ऑनलाइन बुक केलेल्या मोबाइल पार्सलमध्ये चक्क धातूची मूर्ती व हळद-कुंकू देऊन एका महिलेने राहुरीच्या तरुणाला फसवले. फसगत झालेल्या तरुणाने पोलिसात धाव घेऊन घडलेल्या घटनेबाबत कैफियत मांडली. मात्र, पश्चातापाशिवाय काहीच वाट्याला आले नाही.


    मुजफ्फर बाबू इनामदार (बुवाशिंदबाबा गल्ली) या तरुणाला लकी ड्रॉमध्ये नंबर निघाला असून १८ हजार किमतीचा ओप्पो मोबाइल अवघ्या ४ हजारांत मिळणार आहे. वस्तू हवी असेल, तर नजीकच्या पोस्टात रक्कम भरून पार्सल ताब्यात घ्या, अशी माहिती अज्ञात तरुणीने त्यांना मोबाइलवरून दिली.


    मुज्जफरच्या आनंदाला पारावार उरला नाही. काही जवळ साठवलेले, तर काही पैशांची उसनवार करून मुजफ्फरने बुधवारी राहुरीचे पोस्ट कार्यालय गाठत चार हजार रुपये भरून पार्सल ताब्यात घेतले. मुजफ्फर यास लकी ड्रॉत नंबर लागल्याची माहिती समजल्याने उत्सुकतेने मित्रदेखील घरी जमले होते. मात्र, पार्सल उघडताच मूर्ती व हळद-कुंकू नजरेस पडताच सगळ्यांचे चेहरे पडले. मुजफ्फरने तर कपाळाला हात मारून कर्माला दोष दिला. आपणास गंडा घातल्याचे लक्षात येताच त्याने पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना घटनेची माहिती दिली. हा ऑनलाइन फसवाफसवीचा खेळ असल्याने यापुढे सावधानता बाळगण्याचा सल्ला पोलिस निरीक्षक शिळीमकर यांनी त्याला दिला.

Trending