ऑनलाईन फसवणूकीचा असाही प्रकार : फेसबुकवर बनावट रिव्ह्यूतून ग्राहकांची करतात फसवणूक

वृत्तसंस्था

Apr 22,2019 09:31:00 AM IST

सॅन फ्रान्सिस्को - ऑनलाइन शॉपिंग करताना ग्राहकांच्या अभिप्रायावर डोळे झाकून विश्वास ठेवत असाल तर यापुढे थोडी काळजी घेतलेली बरी. तुम्ही एखादे उत्पादन खरेदी करण्यासाठी रिव्ह्यूला आधार ठरवत असाल तर तो कदाचित बनावटही असू शकतो. बनावट बातम्यांप्रमाणेच आता बनावट रिव्ह्यूचा प्रकार सुरू झाला आहे. जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या ऑनलाइन ग्राहकांना फेसबुक ग्रुपवर बनावट रिव्ह्यूद्वारे जाळ्यात ओढले जात आहे. ब्रिटनचा ग्राहक हित गट विचसह अनेक कंपन्या व उद्योगपतींनी फेसबुक ग्रुपद्वारे अॅमेझॉनच्या साइटवर विकणाऱ्या उत्पादनांचा बनावट रिव्ह्यू होत आहे. अनेक उत्पादकांनी मनमानी पद्धतीने गुणांकन देऊन अॅमेझॉनच्या जगभरात विस्तारलेल्या २६० कोटी ग्राहकांना फसवले जात आहे. विचच्या दाव्यानुसार, अॅमेझॉनच्या साइटवर विकल्या जाणाऱ्या शेकडो उत्पादनांचे विश्लेषण केल्यानंतर अनेक अनोळखी ब्रँडने लोकप्रिय आयटम्सच्या सर्चमध्ये आपले वर्चस्व राखले आहे. एवढेच नव्हे तर, ८७ हजारांहून जास्त लोक बनावट रिव्ह्यू करण्यात गुंतले आहेत.


विचनुसार, सकारात्मक परंतु सत्यापित न केलेल्या उत्पादनांची यादी विक्रेते करत अाहेत. याचा अर्थ साइटवर उत्पादनाचा रिव्ह्यू देणाऱ्या लोकांचा कोणताही आधार नाही. एकाच दिवशी पेजवर शेकडो असत्यापित पंचतारांकित रिव्ह्यू पोस्ट केल्याचे आढळले. विचने हेडफोन, स्मार्ट वॉच व व्हियरेबल डिव्हाइससह अॅमेझॉनवरील १४ तांत्रिक उत्पादनासाठी सर्च केले. पहिल्या पानावर हेडफोनचा समाधानकारक अभिप्राय नोंदवला होता. त्यात १०० अशा ब्रँडच्या वस्तू होत्या, ज्या तज्ञांनी कधी ऐकल्याही नव्हत्या.

तक्रारीवर फेसबुककडून कारवाईचे आश्वासन
बनावट रिव्ह्यू प्रकरणात फेसबुकच्या म्हणण्यानुसार, तक्रार मिळाल्यानंतर आमच्या धोरणांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरवत आहोत. अॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार, आमच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचत असेल तर कायदेशीर कारवाई करण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे.

X
COMMENT