आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर - तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना यावर्षी मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी सांगितले. तसेच मुलींना पहिल्या वर्षी वसतिगृह मोफत असल्याचे सांगितले.
तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गिरासे यांनी ही माहिती दिली. यावेळी नायब तहसीलदार शीतल कान्हेरे, प्राचार्य शेखर जगदे, उपप्राचार्य प्रा. रवी मुदकन्ना, प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. पी.टी. सूर्यवंशी, प्रा. विवेक गंगणे आदी उपस्थित होते. गिरासे म्हणाले, अभियांत्रिकी प्रथम वर्ष व थेट दितीय वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेनुसार फीमध्ये २५ ते १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच प्रवेशार्थी मुलींना एका वर्षाकरिता वसतिगृहामध्ये राहण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून नवीन ६० संगणक खरेदी करण्यात आले आहेत तर जुने १०० संगणक अद्ययावत करण्यात आले आहेत. जवळपास ६० लाख रुपये खर्चून नवीन अद्ययावत उपकरणे मागवण्यात आली आहेत. याशिवाय अंतर्गत रस्ते, रंगरंगोटी आदींवर एकूण ६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे गिरासे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.