आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये अवघ्या 3 लाखांत खरेदी करा स्वतःचे घर, तब्बल 1 कोटी घरे विक्रीला; अशी आहे अट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क-  तुम्ही विदेशात घर घ्यायचा विचार करत असाल तर जपान तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, जपानने जवळपास 1 कोटी घरे रिकामी झाली आहे. ही घरे 'आकिया' (Akiya) बँक या वेबसाइटवर विक्रीसाठी असून यापैकी अनेक घरे मोफत मिळत आहे. यासाठी जपान प्रशासनाने एक अट ठेवली आहे. अटीनुसार घर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला जपान सरकारला प्रॉपर्टी टॅक्‍स देणे आवश्यक आहे.  

 

1 कोटी रिकामी घरे 

सीएनबीसीडॉटकॉमच्या रिपोर्टनुसार, जपानमध्ये वृद्धांचे वाढते प्रमाण आणि लोकसंख्येची घट यामुळे मोठ्याप्रमाणात घरे रिकामी होत आहे. त्यामुळे  जपानच्या विविध शहरांमध्ये रिकाम्या घरांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या समस्येमुळे जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्‍यवस्‍था असलेल्या जपान देशात घरमालकांनी स्थलांतर आणि काहींनी घरे सोडून दिल्यामुळे जवळपास 1 कोटी घरे रिकामी झाली आहे.

 

काय आहे या घरांची किंमत

> एका घराची किंमत जपानी मुल्य 5 लाख येन म्हणजे जवळपास 3 लाखांपासून 2 कोटींपर्यंत आहे. घरांचे ठिकाण, घराची अवस्था यावर या घरांची किंमत अवलंबून आहे. 
> टोक्‍यो शहरात रिकाम्या घरांची सरासरी संख्या 11.1% असून 2033 पर्यंत वाढून 20 टक्केपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. फुझित्‍सू रिसर्च इंस्टिट्युटच्या अंदाजानुसार 2008 मध्ये जपानमध्ये 7.568 दशलक्ष घरे रिकामी होती.

 

स्‍थानिक प्रशासनाच्या वेबसाइटवर रिकाम्या घरांची यादी

जपानच्या विविध शहरांतील स्‍थानीक प्रशासन आणि कम्‍युनिटीने त्यांच्या वेबसाइटवर रिकाम्या घरांची यादी प्रकाशित केली आहे. ग्राहक या वेबसाइटवर विविध घरांची तुलना करुन घरे खरेदी करु शकतात. जपानमधील कागोशिमा, कोचि आणि वाकायामा या शहरांत मोठ्या प्रमाणात घरे रिकामी झाली आहे.

 

युवकांना मिळतील मोफत घरे

आकिया योजनेनुसार युवाकांना मोफत घरे मिळणार असुन घराच्या पुर्नबांधणीसाठी तिथिल प्रशासनाकडून सब्सिडी दिली जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...