आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२ वीपर्यंतच्या मुलींना एसटीचा मोफत पास; ज्येष्ठांना शिवशाहीत ४५% सूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिक्षणासाठी ग्रामीण भागातून परगावी जाणाऱ्या बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना एसटी महामंडळ माेफत प्रवास सवलत पास देणार आहे. पूर्वी दहावीपर्यंतच्याच मुलींना हा लाभ हाेता. ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना शिवशाही (अासन व्यवस्था) बस तिकिटात ४५% सवलत मिळेल. तसेच अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही शिवशाहीतून माेफत प्रवास करता येईल. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात अाल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. 


ज्येष्ठ नागरिकांचा वयाचा पुरावा म्हणून अाधार कार्ड मान्य असेल. दरवर्षी त्यांना शिवशाहीतून ४,००० किमीपर्यंत सवलतीच्या दरात प्रवास करता येईल. १९८६ नंतर सुरू झालेल्या विविध तंत्र व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा पास सवलत योजनेत समावेश होईल. क्षयरोग व कर्करुग्णांची ५०% सवलत ७५% पर्यंत वाढवली जाईल. सिकलसेल, हिमोफिलिया व एचआयव्हीग्रस्तांना माेफत प्रवास करता येईल. सध्या १००% अपंग व्यक्तीसोबत प्रवास करणाऱ्यांना ५०% सवलत आहे. अाता रेल्वेच्या धर्तीवर ६५% अपंगत्व असणाऱ्यासाेबत प्रवास करणाऱ्यासही ५०% भाडे सवलत मिळणार अाहे. 


कौशल्य सेतू अभियान 
दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या कौशल्य सेतू अभियान योजनेतील १११ प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान ते प्रशिक्षण केंद्र या प्रवासासाठी ६६.६७ % प्रवासभाडे सवलतीचा लाभ मिळेल. या नव्या याेजनेत लाभार्थींना आधार कार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येईल. 

बातम्या आणखी आहेत...