आंतरराष्ट्रीय / होव्हरबोर्डवरुन इंग्लिश खाडी पार करणारे पहिले इन्व्हेंटर बनसे जपाटा, रॉकेलवर चालेल फ्लायबोर्ड


जपाटाने 22 मिनीटात 170 किमी प्रती तासांच्या वेगाने 35 किमी उड्डाण  भरली

Sep 19,2019 12:23:39 PM IST

पॅरिस- फ्रांसचे शोधकर्ता फ्रँकी जपाटा जेट असलेल्या होव्हरबोर्डवरुन इंग्लिश खाडी पार करणारे पहिले इन्व्हेंटर बनले आहेत. मागील महिन्यात त्यांनी प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आले नाही. पण आता दुसऱ्या प्रयत्नात फ्रँकी यांनी रविवारी सकाळी हे पूर्ण केले. 40 वर्षीय जपाटा यांनी रविवारी सकाळी 6:17 वाजता फ्रांसच्या उत्तर किनारपट्टीवरील संगेटवरुन उड्डाण घेतली आणि इंग्लिश खाडी पर करुन डोव्हरच्या सेंट मार्गरेट बीचवर उतरले.


25 जुलैला जपाटा यांनी खाडी पार करण्याचा प्रयत्न केला होता
रॉकेलच्या साहाय्याने चालणाऱ्या होव्हरबोर्डवरुन त्यांनी 22 मिनीटात 35.4 किमीचा प्रवास केला. जपाटा जेट-स्की चँपियन आहेत. याआधी त्यांनी 25 जुलैला खाडी पार करण्याचा प्रयत्न केला होता.


जपाटा यांनी सांगितले की, आम्ही तीन वर्षांपूर्वी एक मशीन बनवली होती. आता आम्ही इंग्लिश खाडी पार केली आहे. हे खूप अद्भुत आहे. ही ऐतिहासिक घटना आहे का नाही, हे येणारी वेळच सांगेल.

जपाटा यांनी डोव्हरमध्ये सांगितले की, उड्डाणावेळी ते 170 किमी प्रती तासांच्या वेगावर पोहचले होते. खाडी पार करताना त्यांच्यासमोर एक मोठी अडचण दुसऱ्या बॅकपैकमध्ये इंधन भरण्याची होती. मागील वेळेस ते इंधन भरण्यापूर्वीच समुद्रात पडले होते.


खाडी पार करताना त्यांच्या सुरक्षेसाठी एका नावेसोबत तीन हेलिकॉप्टरदेखील होते. मागील महिन्यात पॅरिसमध्ये वार्षिक बास्तील डे परेडदरम्यान जपाटाने सगळ्यांचे लक्ष आकर्षित केले होते, जेव्हा त्यांनी फ्यूचरिस्टिक फ्लायबोर्डवर एक सैन्य प्रदर्शनात भाग घेतला होता.

X