Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

रिलिजन डेस्क | Update - Apr 12, 2019, 12:00 AM IST

शुक्रवारचे राशिफळ : अशुभ योगामध्ये होत आहे आजच्या दिवसाची सुरुवात, नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे या सहा राशीच्

 • friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

  शुक्रवार 12 एप्रिल रोजी आद्रा नसखत्रमध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे अतिगंड नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे. अशुभ योगाच्या प्रभावाने नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

 • friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

  मेष : आज घराबाहेर वावरताना डोके शांत ठेवणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळा अन्यथा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. शुभरंग: तांबडा |अंक:७

 • friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ: राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणारा चंद्र पैशाची कमतरता भासू देणार नाही. आज  वाणीतील गाेडवा कामी येईल. नवविवाहितांची स्वप्नपूर्ती होईल.  शुभरंग: आकाशी |अंक:९ 

 • friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : आज वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. अनेक क्लीष्ट कामे सोपी होतील. कार्यक्षेत्रात अनुभवी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. ध्येयाच्या दिशेने वाटचाल कराल. शुभ रंग : नारिंगी| अंक : ६

 • friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

  कर्क : नोकरी व्यवसायात आज कायद्याची चौकट मोडून चालणार नाही. घरात थाेर मंडळी काही उपदेशांचे डोस पाजतील. प्रवासात सावध रहा. खर्चात कपात गरजेची.  शुभ रंग : क्रिम| अंक : ८

 • friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. व्यवसायाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. विवाहेच्छूकांचे  एखाद्या  समारंभात सूत जुळू शकेल.  शुभ रंग : गुलाबी | अंक : ४ 

 • friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : अधिकारी वर्गाकडून त्रास संभवतो. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. आज मित्रांच्या फार नादी लागूच नका. शुभ रंग : हिरवा | अंक : ५

 • friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : नोकरीच्या ठीकाणी कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. घरात आज वडीलधाऱी मंडळीही आपल्याच मतावर अडून बसणार आहेत. एकांत हवासा वाटेल. शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २

 • friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : उद्योग व्यवसायात अडचणींना तोड द्यावे लागेल. नोकरीत साहेबांचे समाधान होणे केवळ अशक्य. जोडीदारही माझेच खरे म्हणेल. संयमाची गरज आहे. शुभ रंग : मरून | अंक : ३

 • friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

  धनू : तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्वाने समोरच्या व्यक्तीस प्रभावित कराल. तुमच्यातील नेतृत्वगुणांस वाव मिळेल.जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.  शुभ रंग : सोनेरी | अंक : ३

 • friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

  मकर : आजचा दिवस फक्त कर्म करण्याचा. फळ उशिराने का होईना मिळणारच आहे. हितशत्रू सक्रिय असताना भावी उपक्रम आत्ताच उघड करू नका. तंदुरुस्ती महत्वाची. शुभ रंग : राखाडी | अंक : १

 • friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी, मुलांची खेळणी वगैरे व्यवसाय तेजीत चालतील. कलाक्रिडा क्षेत्रातल्या मंडळींना उत्तम संधी मिळतील. हौसमौज कराल.  शुभ रंग : पांढरा  | अंक : ९

 • friday 12 april 2019 daily horoscope in Marathi

  मीन : आज तुमचे मनोबल चांगले असेल. आत्मविश्वास वाढवणाऱी घटना घडेल. मुलांची शैक्षणिक प्रगती समाधानकारक राहील. कलाकारांनी प्रयत्न वाढवावेत.  शुभ रंग : पिस्ता  | अंक : ५

Trending