Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

दिव्य मराठी | Update - Mar 15, 2019, 12:00 AM IST

शुक्रवार राशिफळ : आयुष्मान योगामध्ये होणार दिवसाची सुरुवात, एक्स्ट्रॉ इन्कम होण्याची संधी, या 7 राशींसाठी दिवस राहील खास

 • friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

  शुक्रवार 15 मार्च 2019 रोजी आद्रा नक्षत्र असल्यामुळे आयुष्मान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. एक्स्ट्रॉ इन्कम होण्याची संधी आहे. अडकलेला पैसा मिळेल. कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

 • friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

  मेष : घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचा प्रभाव पडेल. सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींबध्दल समाजात आदर राहील. विद्यार्थी  अभ्यासाचा कंटाळा करतील.  शुभ रंग : क्रिम| अंक : ३

 • friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

  वृषभ : खिशात पैसा खुळखुळेल. मोठेपणा घेण्यासाठी काही अनावश्यक खर्च कराल. कुठेही आपलीच मर्जी चालवायचा तुमचा हट्ट राहील. प्रवास त्रासदायक होईल. शुभ रंग : जांभळा| अंक : ९

 • friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

  मिथुन : आज एखाद्या महत्वाच्या बातमीने दिवसाची सुरवात होईल. व्यवसायात भागिदारांशी असलेले मतभेद मिटतील. आज  वैवाहीक जिवनांत गोडीगुलाबी राहील. शुभ रंग : पिस्ता | अंक : २

 • friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

  कर्क : केवळ मोठेपणा मिळवण्यासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या आंगावर घेऊ नका. अनावश्यक खर्चात कपात गरजेची. नवीन अेळखींवर विश्वास ठेवू नका.  शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३ 

 • friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

  सिंह : नोकरदारांना जास्त पगाराच्या संधी चालून येतील.आलेल्या संधींचा सकारात्मकतेने विचार करणे मात्र गरजेचे आहे. मोठया लोकांच्या ओळखी कामी येतील. शुभ रंग : अबोली | अंक : २

 • friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

  कन्या : कार्यालयिन कामात अधिकाऱ्यांचे दडपण जाणवेल.नोकरदारांनी नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे राहील. मित्र दिलेली अश्वासने पाळणार नाहीत. शुभ रंग : राखाडी | अंक : १

 • friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

  तूळ : उद्योगधंद्याच्या दृष्टीने आजचा दिवस तितकासा अनुकूल नसला तरी आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. शुभ रंग : मोतिया| अंक : ४

 • friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

  वृश्चिक : आज कंटाळवाणा दिवस. दैनंदीन क्षुल्लक कामातही अडचणी येण्याची शक्यता. नवीन व्यावसायिक मंडळींनी मर्यादा ओळखूनच उलाढाली कराव्यात. शुभ रंग : हिरवा| अंक : ५

 • friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

  धनू : आज मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रातील नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण राहील. आरोग्य उत्तम साथ देईल. शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

 • friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

  मकर : नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. कोणतेही कौटुंबिक निर्णय वडीलधाऱ्यांच्या संगनमताने घ्यावे लागतील. शुभ रंग : जांभळा | अंक : ३

 • friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

  कुंभ : आज तुम्ही स्वत:च्या प्रेमात रहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील. दूरावलेल्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल.  शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

 • friday 15 march 2019 Daily horoscope in Marathi

  मीन : जागेसंबंधीत महत्वाचे व्यवहार मार्गी लागतील. आज मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. गृहीणींना आज क्षणभरही उसंत मिळणे कठीण अाहे. शुभ रंग : पांढरा | अंक : ८

Trending