आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 15 नोव्हेंबर रोजी दिवसाची मृग नक्षत्रामध्ये होत आहे. गृह आणि नक्षत्रांच्या प्रभावाने आज 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस विशेष फळ देणारा ठरू शकतो. कुठलाही निर्णय घेताना जोडीदाराला विश्वासात घ्या. उर्वरीत राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र स्वरुपाचा ठरणार आहे.

मेष: शुभ रंग : भगवा | अंक : २
आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. अधुनिक राहणीमानाकडे कल राहील. स्वत:ची हौस भागवण्यासाठी खर्च कराल.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : १
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : २
काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील. नोकरीत अधिकारी वर्ग आपल्यावर खूष आहेच या भ्रमात राहू नका. वरीष्ठ आज गोड बोलून राबवून घेणार आहेत.

कर्क : शुभ रंग : केशरी | अंक : ८
विविध मार्गाने आलेला पैसा जाण्यासाठी विविध मार्ग तयार अाहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. आज कोणतेच धाडस नको...

सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : २
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. वैवाहिक जिवनात जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे. सहपरिवार चैन व मनोरंजनास वेळ द्याल.

कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
आज तुमची तब्येत काहीशी नरमच राहील. नोकरीत सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद संभवतात.

तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेेत. गैरसमजाने दूरावलेली नाती जवळ येतील.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
आज कौटुंबिक कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७
सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमधे वितुष्ट संभवते.

मकर : शुभ रंग : मोतिया | अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : १
सरकार दरबारी रखडलेली काही कामे मार्गी लागतील. कर्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा तसेच कतृत्वाचाही प्रभाव राहील. आज जोडीदाराशी संगनमत राहील.

मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : २
आज तुमच्या हातून वडीलधाऱ्यांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी होईल. नेते मंडळींना दौरे लाभदायक ठरतील. आरोग्यासाठी खर्च संभवतो.