Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

शोभन नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, या 8 राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास राहील शुक्रवार

दिव्य मराठी

Aug 16,2019 12:05:00 AM IST

शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा परफॉर्मन्स चांगला राहील. हे लोक आपल्या कामाने वरिष्ठांचे मन जिंकून घेतील. इंटरनेट, जाहिरात, शेअर बाजार, कमोडिटी आणि खेळाशी संबंधित लोकांसाठी दिवस विशेष खास राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

मेष: शुभ रंग : चंदेरी | अंक : ९ कार्यालयिन कामात अधिकाऱ्यांचे दडपण जाणवेल. नोकरदारांनी नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे राहील. मित्र दिलेली अश्वासने पाळणार नाहीत.वृषभ: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६ उद्योगधंद्याच्या दृष्टीने आज दिवस तितकासा अनुकूल नसला तरी आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील.मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ८ आज कंटाळवाणा दिवस. दैनंदीन क्षुल्लक कामातही अडचणी येण्याची शक्यता. नवीन व्यावसायिक मंडळींनी मर्यादा ओळखूनच उलाढाली कराव्यात.कर्क : शुभ रंग : आकाशी | अंक : ७ आज मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रातील नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण राहील. आरोग्य उत्तम साथ देईल.सिंह : शुभ रंग : डाळंबी | अंक : ४ नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. कोणतेही कौटुंबिक निर्णय वडीलधाऱ्यांच्या संगनमताने घ्यावे लागतील.कन्या : शुभ रंग : केशरी | अंक : १ आज तुम्ही स्वत:च्या प्रेमात रहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील. दूरावलेल्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल.तूळ : शुभ रंग : राखाडी | अंक : ५ जागेसंबंधीत महत्वाचे व्यवहार मार्गी लागतील. आज मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. गृहीणींना आज क्षणभरही उसंत मिळणे कठीण आहे.वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३ घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचा प्रभाव पडेल. सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींबध्दल समाजात आदर राहील. विद्यार्थी अभ्यासाचा कंटाळा करतील.धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : २ खिशात पैसा खुळखुळेल. मोठेपणा घेण्यासाठी काही अनावश्यक खर्च कराल. कुठेही आपलीच मर्जी चालवायचा तुमचा हट्ट राहील. प्रवास त्रासदायक होईल.मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४ आज एखाद्या महत्वाच्या बातमीने दिवसाची सुरवात होईल. व्यवसायात भागिदारांशी असलेले मतभेद मिटतील. आज वैवाहीक जिवनांत गोडीगुलाबी राहील.कुंभ : शुभ रंग : निळा | अंक : १ केवळ मोठेपणा मिळवण्यासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या आंगावर घेऊ नका. अनावश्यक खर्चात कपात गरजेची. नवीन अेळखींवर विश्वास ठेवू नका.मीन : शुभ रंग : केशरी | अंक : २ नोकरदारांना जास्त पगाराच्या संधी चालून येतील.आलेल्या संधींचा सकारात्मकतेने विचार करणे मात्र गरजेचे आहे. मोठया लोकांच्या ओळखी कामी येतील.
X