आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 18 ऑक्टोबर 2019 रोजी दिवसाची सुरुवात रोहिणी नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या योगामुळे एक शुभ योग जुळून येत आहे. त्याचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होऊ शकतो. टेंडर, टॅक्स, सबसिडी इत्यादी स्वरुपात धनलाभ होऊ शकतो. नोकरदार लोकांना पेन्शन, पीएफ, व्हीआरएसही मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. मेष: शुभ रंग : क्रिम | अंक : २ बेरोजगारांनी रोजगारासाठी दूरगावी जाण्याची तयारी ठेवावी. उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्विकारावी लागेल. आज खर्च आवाक्या बाहेर राहील. वृषभ: शुभ रंग : केशरी | अंक : ८ प्रतिष्ठींतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस. मिथुन : शुभ रंग : भगवा | अंक : २ कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल. कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : १ उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने आज नव्या उपक्रमाची सुरवात टळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल. सज्जनांचा सहवास लाभेल. सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ९ आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. सगळयाच गोष्टी आपल्याच मनासारख्या होतील अशी अपेक्षा करु नका. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नको. कन्या : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २ आपल्या अतीस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज मित्रांमधे न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे . तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७ अती श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. कुणाकडून येणी असतील तर मागायला लाजू नका. पत्नीस नाही म्हणू नका वृश्चिक : शुभ रंग : मोतिया| अंक : ३ प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कुटुंंबियांच्या वाढत्या गरजा पुरवाव्या लागतील. धनू : शुभ रंग : जांभळा| अंक : ५ कष्टांचाही अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे लक्षात ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकलेल्या बऱ्या. आज व्यस्त दिवस. मकर : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६ काहीजणांना घरदुरुस्तीच्या काही करकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. अाज कदाचित वाहनही रस्त्यात रूसुन बसण्याची शक्यता आहे. सतर्क रहा. कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : १ धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील.नवे उपक्रम जोमाने सुरु करता येतील. महत्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर अडून राहता येईल. मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : २ आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका.

बातम्या आणखी आहेत...