आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

हनुमान जयंती राशिफळ  : चैत्र पौर्णिमा आणि चित्र नक्षत्रामुळे जुळून येत आहे खास योग, 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील

दिव्य मराठी

Apr 19,2019 12:00:00 AM IST

शुक्रवार 19 एप्रिलला चित्रा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती आहे. आजच्या या तीन शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : व्यावसायिक अडचणींवर धैर्याने मात कराल. ज्येष्ठ मंडळींनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. श्वसनाचे विकार असतील तर विशेष काळजी घ्या. शुभ रंग : राखाडी|अंक : १वृषभ : व्यावसायिक उलाढाल वाढेल. शेअर्स बाजारातील अंदाज योग्यच ठरतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. शुभ रंग : पिस्ता|अंक : ३मिथुन : बांधकाम व्यावसायिकांसाठी आज विषेश अनुकूल दिवस आहे. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. मुलांना दिलेले शब्द पाळल. गृहसौख्याचा दिवस. शुभ रंग : जांभळा|अंक : ३कर्क : आज काही मनाजोगत्या घटना घडतील. भावंडांतील कटूता दूर होऊन सलोखा निर्माण होईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. शुभ रंग : तांबडा|अंक : ९सिंह : जमेची बाजू जड असून नोकरी धंद्यात उत्साहाचे वातावरण राहील. आज वाणीत मृदुता असेल तर अनेक क्लिष्ट कामे सोपी होतील. वक्तृत्वास वाव मिळेल. शुभ रंग : लाल | अंक : १कन्या : आज तुम्ही जरा हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून न घेता आपलेच घोडे पुढे दामटवाल. तुमच्या अतिस्पष्ट बोलण्याने आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे.शुभ रंग : हिरवा | अंक : २तूळ : खर्चाचे प्रमाण आवाक्याबाहेर जाईल. दूरचे नातलग संपर्कात येतील. ज्येष्ठ मंडळींचे अध्यात्मात मन रमेल. पासपोर्ट, व्हिसाविषयक कामातील अडथळे दूर होतील. शुभ रंग : भगवा | अंक : ५वृश्चिक : आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून आज तुम्ही जी म्हणाल ती पूर्व करूनच दाखवाल. गृहिणी आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील. दिवस लाभाचा. शुभ रंग : गुलाबी | अंक : ४धनू : आज फक्त आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. तुमच्या कामातील निष्ठेने वरिष्ठ खुश होतील. प्रकृतीवर ताण पडणार आहे. शुभ रंग : आकाशी | अंक : २मकर : नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक धाडस करावे. अति आक्रमकतेने निराशा पदरी पडण्याची शक्यता. संयमाची गरज आहे. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६कुंभ : आज जे काही कराल ते करताना आधी प्रकृतीस जपा. एकावर विसंबून दुसऱ्यास आश्वासने देऊ नका. आज आर्थिक उलाढाली टाळलेल्याच बऱ्या. शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७मीन : आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात उभी असलेली नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८
X