Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

आजचे राशीभविष्यः डबल फायदा देणारा ठरू शकतो शुक्रवार, या 6 राशींवर ग्रहांची राहील विशेष कृपा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 22, 2019, 12:00 AM IST

इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य

 • friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

  शुक्रवारी चंद्र उच्च राशीमध्ये राहील. रोहिणी नक्षत्राचा संयोग जुळून आल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील. या सहा राशीच्या लोकांना गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारात नशिबाची साथ मिळेल. नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळेल. नवीन कामाची जबाबदारी मिळू शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

 • friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

  मेष - आर्थिक दृष्टीने अनुकूल दिवस असून आज सर्व महत्वाची कामे मार्गी लावू शकाल. मात्र भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. शुभ रंग: जांभळा, अंक-१.

 • friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

  वृषभ - म्हणेन ती पूर्व असा आजचा  दिवस. बरीच अवघड कामे आज सोपी होतील. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीने मन प्रफुल्लीत होईल. प्रलोभने टाळायला हवीत. शुभ रंग : नारिंगी, अंक-३.

 • friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

  मिथुन - आज तुम्हाला कुवतीबाहेरची काही कामे करावी लागतील. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. मित्रांवर अवलंबून कोणतेही निर्णय घेऊ नका. दिवस खर्चाचा.  शुभ रंग : डाळिंबी, अंक-४.

 • friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

  कर्क - काही अनपेक्षित लाभ मनास दिलासा देतील. गृहीणींना आज काटकसर  करण्याची गरज नाही. ध्येय निश्चित करुन मार्गक्रमणा करा. यशाची खात्री आहे. शुभ रंग : सोनेरी, अंक-९.

 • friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

  सिंह - आपल्या नम्र वागणूकीने थोरामोठयांचे अशिर्वाद मिळवाल. नोकरीत बढतीचे योग चालून येतील. आज उद्योग व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल.शुभ रंग : पिवळा, अंक-६.

 • friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

  कन्या - उद्योग व्यवसायात विरोधी वातावरण. नोकरदारांना वरीष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. आज रागावर ताबा ठेवणे गरजेचे. मित्रांना दूरूनच बाय करा. शुभ रंग : पिस्ता, अंक-५.

 • friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

  तूळ - कार्यक्षेत्रातात काही प्रमाणात तणाव असेल. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारु नका. मतभेद व कलह यांपासून आवर्जुन लांब राहीलात तर बरे होईल. शुभ रंग: पांढरा, अंक-७.

 • friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

  वृश्चिक - वेळेचा सदुपयोग करुन बरीच रखडलेली कामे हातावेगळी कराल. मोठे उपक्रम राबवणे शक्य होईल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील. शुभ रंग : मोतिया, अंक-६.

 • friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

  धनू - लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यात वेळ न घालवता आधी वैवाहीक जिवनातील कर्तव्ये पार पाडण्यास प्राधान्य देणे गरजेचे. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटींनी स्वार्थ साधून घ्या. शुभ रंग : लाल, अंक-५.

 • friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

  मकर - महत्वाच्या चर्चा, बैठकीत आज आपले विचार इतरांना पटवून देता येतील. अंगी असलेल्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. अधुनिक राहणीमानाकडे कल राहील. शुभ रंग: सोनेरी, अंक-३.

 • friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

  कुंभ - आज परिवारात असलेले सामंजस्य ही तुमच्यासाठी जमेची बाजू असेल. गृहीणींच्या कष्टांचे चीज होईल. प्रेमप्रकरणे डोक्याला नसता ताप देतील. शुभ रंग: निळा, अंक-२.

 • friday 22 March 2019 daily horoscope in marathi, rashi bhavishya

  मीन - काही कौटुंबिक मतभेद तुम्हाला त्रस्त करतील. अतीशहाण्या व्यक्ती संपर्कात येतील. आज घराबाहेर वावरताना डाेके शांत ठेवणे गरजेचे. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-८. 

Trending