Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

रिलिजन डेस्क | Update - Apr 05, 2019, 12:00 AM IST

शुक्रवार राशीफळ : आज अमावास्या तरीही 12 पैकी 8 राशीच्या लोकांचे वाढू शकते उत्पन्न आणि नष्ट होतील अडचणी, जुळून येत आहेत ख

 • aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

  शुक्रवार, 5 एप्रिलला रेवती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे इंद्र योग जुळून येत आहे. यासोबतच आज अमृतसिद्धी नावाचाही शुभ योग जुळून येत आहे.इंद्र योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. पती-पत्नी आणि बिझनेस पार्टनरमधील गैरसमज दूर होतील. अडकलेली कामे पूर्ण झाल्यामुळे धन लाभाची शक्यता वाढत आहे. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

 • aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

  मेष : आज तुम्हाला काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी विचार अवश्यक. गृहीणींना झाकली मूठ झाकलीच ठेवावी. शुभ रंग : मरून  | अंक : ७

 • aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ : एखाद्या नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू आहे. अपूरी स्वप्ने साकार होतील. शुभ रंग : केशरी | अंक : ६

 • aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : उद्योग व्यवसायात प्रगतीरथ वेेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील. शुभ रंग : क्रिम | अंक : २

 • aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

  कर्क : नोकरीत काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरीष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.विरोधकांशी गाेड बोलूनच वेळ मारून न्यावी लागेल. शुभ रंग : पिस्ता | अंक : १

 • aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : आज काही क्षुल्लक कारणाने घरातील थोरांशी मतभेद संभवतात. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत व्यवहार नकोत. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५ 

 • aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्ती कराल. पत्नीस दिलेली वचने पाळाल.  शुभ रंग :गुलाबी | अंक : ४

 • aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काबाड कष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपेल. मित्रांमधे आज काही वैचारीक मतभेद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : पांढरा | अंक : ५

 • aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल.  नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. शुभ रंग : मोतिया | अंक : ३

 • aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

  धनू : मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या कौटुंबिक सोहळयात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना आधी स्वत:ची शिल्लक तपासणे गरजेचे.  शुभ रंग : भगवा | अंक : ९

 • aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

  मकर : अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. महत्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे.  शुभ रंग : डाळिंबी  | अंक : ६

 • aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : अधुनिक रहाणिमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहीणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. छान दिवस. शुभ रंग : लाल  | अंक : ७

 • aajache rashibhavishya Friday 5 april 2019 daily horoscope in Marathi

  मीन : आज संयमाची गरज असून अती उत्साहाच्या घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. मुलांनी पालकांच्या आज्ञेत रहावे.  शुभ रंग : पांढरा  | अंक : ८

Trending