आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या आपल्या राशिसाठी कसा राहील आजचा शुक्रवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 रोजी दिवसाची सुरुवात पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावाने आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. तर इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरेल. काहींच्या बाबतीत आज लोक खोटी स्तुती करतील. परंतु, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काही करण्याच्या नादात न पडलेलेच बरे. गृहिणींना आजच्या दिवशी क्षुल्लक कारणांवरून वाद टाळावे लागतील.

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार
 
मेष : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
ज्यात कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. आज दैनंदीन कामातही अडथळ्यांची शर्यत असेल. गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.
वृषभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५
कुणी आज पाठीवर हात ठेऊन लढ म्हणाले म्हणून लगेच तुम्ही लढायला जावू नका. आज स्वत:च्या मर्यादा ओळखून वागणेच तुमच्या हिताचे असेल.
मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक :
२ जोडीदाराच्या खंबीर साथीने कोणत्याही अडचणी सहजच सुटतील. प्रवासास निघाला असाल तर मात्र आज थोडासा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १
तब्येतीच्या क्षुल्लक तक्रारींकडेही दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्याचप्रमाणे आज कोणतेही निर्णय उतावीळपणे घेऊ नका. मंगलकार्याची बोलणी उद्यावरच ढकला.
सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६
कवींना रोमँन्टीक काव्य सुचतील. गृहीणी आज पार्लर्ससाठी आवर्जुन वेळ काढतील. बऱ्याच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल.
कन्या : शुभ रंग : मरून| अंक : ४
बिल्डर्स, कंत्राटदार व दलाल यांच्यासाठी अनुकूल दिवस. जागेच्या खरेदीसाठी कर्जमंजूरी होईल. आज ज्येष्ठ मंडळींना दम्याचे विकार त्रस्त करतील.
तूळ : शुभ रंग : क्रिम| अंक : ७
नोकरीत कंटाळवाणी कामे करावी लागतील. हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह होईल. काही कारणांसाठी मातोश्रींची नाराजी पत्करावी लागेल.
वृश्चिक : शुभ रंग : पिवळा| अंक : ३
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. आज आर्थिक बाजूही चांगली असेल. अती स्पष्ट बोलून आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे.
धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९
रिकाम्या चर्चेून वादविवाद होतील. आज वैवाहिक जिवनात जोडीदाराचे वर्चस्व मान्य करणे हिताचे राहील. व्यवसायात भागिदारांना विश्वासात घ्यावे लागेल.
मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : २
काही आवाक्या बाहेरचे खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. जमाखर्चाचे बजेट विस्कळीत होईल. घरात थोरांशी मतभेद होतील. त्यांच्या वयाचा मान राखाल.
कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : १
व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला लाभ पदरात पडेल. दूरावलेले आप्तस्वकिय जवळ येतील. मनोकामना पूर्ण होतील.
मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८
ध्येयप्राप्तीसाठी थोडी सकारात्मकता वाढवावी लागेल. कामाचे तासही वाढवावे लगतील. सुसंवादाने प्रश्न सोपे होतील. गृहीणींनी क्षुल्लक गोष्टी विसरुन जाणे हिताचे.