आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्याही शुक्रवारी रात्री करू शकता विलायचीचा 1 उपाय, यामुळे प्राप्त होईल देवी लक्ष्मीची कृपा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार देवी लक्ष्मी तसेच शुक्र ग्रहाशी संबंधित दिवस मानला जातो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी शुक्र ग्रहाला अनुकूल करण्यासाठी उपाय केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला विलायचीचा असा एक उपाय सांगत आहोत, जो धन-संपत्ती प्रदान करू शकतो. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.फक्त या एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की, उपाय शुक्रवारी रात्री 12 नंतरच करावा...


अशाप्रक्रारे करा उपाय
- शुक्रवारी रात्री 12 पूर्वी चांगल्याप्रकारे हात-पाय धुवून स्वच्छ व्हावे आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करावेत.
- त्यानंतर कमळाच्या आसनावर विराजित देवी लक्ष्मीचा फोटो घरातील एखाद्या शांत आणि स्वच्छ ठिकाणी स्थापित करावा.
- त्यानंतर या फोटोसमोर 3 विलायची ठेवून आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. त्यानंतर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे ध्यान करत शुक्रदेवाकडे इच्छापूर्ती आणि सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी.
- त्यानंतर शुक्र मंत्र ऊं द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम: चा 21 वेळेस जप करावा.
- आता तीन विलायची स्वतःच्या डाव्या हाताच्या मुठीमध्ये ठेवून नवग्रहाचे ध्यान करत अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी.
- त्यानंतर मूठ उघडून त्यावर 3 वेळेस फुंकर मारावी. त्यानंतर विलायची एका वाटीमध्ये ठेवून मुख्य दरवाजावर जावे.
- त्यानंतर वाटीमध्ये कापूर टाकून सर्व सामग्री जाळावी. विलायची पूर्णपणे जळून गेल्यानंतर तुळशीच्या कुंडीमध्ये टाकावी.
- तुळस नसल्यास नदीमध्ये प्रवाहित करावी. थोड्याच दिवसांमध्ये प्रभाव दिसू लागेल.

बातम्या आणखी आहेत...