आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - दिलशाद गार्डन परिसरात 10 दिवसांपूर्वी राहायला आलेल्या आई-मुलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. आरोपीने महिलेचा मृतदेह बेडमध्ये लपवून ठेवला. शनिवारी संध्याकाळी घटनेचा उलगडा झाला, जेव्हा महिलेची बहीण तिला भेटायला घरी आली. पोलिसांनी दावा केला की, महिलेचा मुलाचा मित्रानेच एका साथीदाराच्या मदतीने या हत्या केल्या आहेत. आरोपीने महिलेकडून 25 हजार रुपयांचे कर्ज घेतलेले होते.
परिचितांवर गेला संशय, 50 जणांची चौकशी, पोलिसी खाक्या दाखवताच मित्राने केले कबूल:
पोलिसांच्या तपासात समोर आले की, या हत्या करणारा दुसरा कोणी नसून घरातल्यांच्या जवळचाच कोणीतरी असावा. घरात परिचितासारखा प्रवेश आणि नंतर बाहेर कुलूप लावलेले पाहून याला बळ मिळाले. मग पोलिसांनी रवी आणि बीना यांच्या संपर्कातील लोकांची माहिती मिळवली. जवळजवळ 40-50 जणांची चौकशी करण्यात आली. ज्यात रवीचा मित्र अंकित (20) सुद्धा होता. कडक चौकशी केल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला.
घटनेच्या वेळी बीना घरात एकटीच होती, रवी नंतर आल्यावर त्याचीही केली हत्या:
17 ऑगस्टच्या रात्री साडे नऊ वाजता अंकित एका आणखी साथीदारासोबत रवीच्या घरी गेला. तेव्हा बीना एकट्याच होत्या. दोघांनी उधारी फेडण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला आणि बीनाची हत्या करून तिचा मृतदेह बेडमध्ये लपवला. यानंतर जेव्हा रवी घरी पोहोचला, तेव्हा त्याचाही खून केला. रवीशी त्याची ओळख वर्षभरापूर्वी कॉम्प्यूटर कोर्सदरम्यान झाली होती. त्याने बीनाकडून दीड महिन्यापूर्वी 25 हजार रुपये उधार घेतले होते. बीना परत पैसे मागू लागली होती. तेव्हा त्याने हत्येचा कट रचला. पोलिस दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी छापे टाकत आहेत.
लिव्ह इनमध्ये राहणारा म्हणाला- मी दोन दिवसांपासून यूपीत आहे, पोलिसांकडून माहिती मिळतेय:
पोलिस अधिकारी म्हणाले की, बीनाच्या पतीचे निधन झालेले आहे. परंतु मागच्या आठ-नऊ वर्षांपासून एक व्यक्ती तिच्या जवळचा होता. या नात्याबाबत बीनाच्या कुटुंबीयांनाही माहिती होती. आधी पोलिसांचा तपास त्या व्यक्तीवर केंद्रित होता. पोलिसांनी त्याला फोनवर घटनेबाबत सांगितले. तो पोलिसांना म्हणाला की, तो बिझनेससाठी 17 ऑगस्टच्या एक-दोन दिवसांपूर्वीच दिल्ली सोडून उत्तर प्रदेशमध्ये गेला होता. त्याला पोलिसांकडूनच ही घटना कळतेय. तथापि, पोलिस त्या व्यक्तीकडून आणखी माहिती गोळा करत आहेत.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.