आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी गोष्ट, कार देण्याच्या मोबदल्यात मागितली गर्लफ्रेंड ; मित्राने केला खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणा : हरियाणामध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला फिरविण्यासाठी मित्राकडे गाडी मागितली असता दुसऱ्या मित्राने गाडी देण्याच्या मोबदल्यात प्रेयसीसोबत शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली होती. याच गोष्टीचा राग आल्याने त्याने आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  

 

गाडीच्या मोबदल्यात केली प्रेयसीच्या शरीरसुखाची मागणी
विनोद आणि विक्रम असे दोघा मित्रांची नावे आहेत. दोघांमध्ये पूर्वीपासूनच खूप घट्ट मैत्री होती. दोघांची नेहमीच एकमेकांसोबत उठबस होत असे. घनिष्ट मैत्री असल्यामुळे विनोद माझ्या कोणत्या गोष्टीला ना करणार नाही याची विक्रमला खात्री होती. त्यामुळे विक्रमने आपल्या गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी विनोदकडे गाडी मागितली होती. विनोदनेही विक्रमला गाडी देण्याचे मान्य केले. पण त्या बदल्यात त्याच्याकडे गर्लफ्रेंडसोबत शरीर संबंधाची मागणी केली. यामुळे विनोद आणि विक्रम यांच्यात वाद झाला होता.    

 

15 डिसेंबरला संध्याकाळी 7 विक्रम आणि विनोद दोघेही सोबतच गाडीतून फेरफटका मारायला निघाले होते. फिरायला जाताना विक्रमने रस्त्यातच बिअरच्या दोन बाटल्या घेतल्या. काहीवेळाने त्यांच्या पुन्हा गाडीच्या देण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला. पण यावेळी राग अनावर झाल्यामुळे विक्रमने विनोदची गळा आवळून हत्या केली. डीएसपी लोहान संबंधीत प्रकरणाची चौकशी करत आहे.  

बातम्या आणखी आहेत...