आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुड्या मित्राला शिकवला असा धडा, आयुष्यभर पुन्हा लावणार नाही दारुच्या बाटलीला हात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकाः दारुचे व्यसन हे जीवघेणे असते. आपल्या एका मित्राच्या या व्यसनाला कंटाळून त्याच्या काही मित्रांनी त्याला असा धडा शिकवला की, तो आता आयुष्यभर दारुला हात लावणार नाही. अमेरिकेत राहणा-या टॉमला दारुचे व्यसन जडले होते. तो दारु पिऊन गाडी चालवत असे. हे त्याचा जवळचा मित्र असलेल्या रे ला काही रुचले नाही. टॉमने अनेकदा दारुच्या नशेत इतरांना धडक दिली होती. पण तरीही तो दारुचे व्यसन सोडायला तयार नव्हता. 

 

मग मित्रांनी बनवला असा प्लान...

- टॉमच्या दारुच्या व्यसनाला कंटाळलेल्या रे आणि त्याच्यासह त्याच्या काही मित्रांनी मिळून एक योजना आखली. सगळ्यांनी एका पार्टीचा प्लान केला. यामध्ये त्यांनी टॉमलाही बोलावले. टॉमने नेहमीप्रमाणे पार्टीत दारु प्यायली. त्यानंतर तो गायब झाला. टॉम गाडीत झोपलेल्या अवस्थेत रेला त्याच्या गाडीत आढळला.

 

मग सुरु झाला दुसरा प्लान... 

- टॉम झोपल्यानंतर खरा खेळ सुरु झाला. त्याला उचलून त्याचे काही मित्र एका खोलीत घेऊन गेले. प्लाननुसार सगळ्यांनी मिळून एक नकली हॉस्पिटल तयार केले. हॉस्पिटलमधील बेडपासून ते काही खोट्या मशीनरी तेथे लावल्या. या बनावट हॉस्पिटलमध्ये टॉमला दाखल करण्यात आले. इतकेच नाही तर त्याच्या मित्रांनी एक नर्ससुद्धा या खोट्या हॉस्पिटलमध्ये आणली होती.


जेव्हा जागा झाला टॉम... 
- दुस-या दिवशी जागे झाल्यानंतर टॉम स्वतःला हॉस्पिटलमध्ये बघून अचंबित झाला. त्याच्या जवळ उभी असलेली नर्स त्याच्याकडे त्याच्या तब्येतीची चौकशी करते. एक डॉक्टर तिथे येतो आणि टॉमला असे काही सांगतो, जे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते.

 

- खोटा डॉक्टर बनलेला तरुण म्हणतो, ''टॉम तू दहा वर्षांनी कोमातून परत आला आहेस. दारु पिऊन गाडी चालवत असताना तुझा भयानक अपघात झाला होता आणि त्यामुळे तू कोमात गेला होता.'' हे ऐकून टॉम सून्न पडतो. तेवढ्यात डॉक्टर बनलेला त्याचा मित्र त्याच्या तोंडावरचा मास्क काढतो आणि टॉमला बेदम मारहाण करतो. जर तू नशेत गाडीत चालवली तर एक दिवस असा येऊ शकतो, असे तो टॉमला म्हणाला. त्यानंतर टॉमला आपल्या चुकीची जाणीव होते आणि पुन्हा कधीही दारुला स्पर्श न करण्याचे वचन तो आपल्या मित्रांना देतो.  

बातम्या आणखी आहेत...